corruption 
उत्तर महाराष्ट्र

आदिवासी प्रकल्प कार्यालयात २० लाखांचा गैरव्यवहार ! 

सकाळ वृत्तसेवा

यावल : येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील तत्कालीन चार प्रकल्प अधिकाऱ्यांसह सहा जणांनी २० लाख ४२ हजारांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. हा गैरव्यवहार २००४ ते २००९ दरम्यान झालेला आहे. 

तत्कालीन प्रकल्प अधिकारी एस. टी. भालेराव यांचेविरुद्ध गैरव्यवहाराचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार यावल एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामध्ये तत्कालीन प्रकल्प अधिकारी एस. टी. भालेराव, टी. बी. पाडवी, एन. एम. निकुंबे, जी. एन. वळवी, जळगाव येथील अन्नदाता कृषी संशोधन संस्थेचे अध्यक्ष, सचिव व व्हिलेज केमिकल सोसायटीच्या अध्यक्षांसह, अधिकाऱ्यांनी सन २००४ ते २००९ दरम्यान, संगनमत करुन अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी लघू उपसा जलसिंचन योजना कामात तब्बल वीस लाख बेचाळीस हजार रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक करून, आर्थिक नुकसान केले. या प्रकरणी शासनाकडून उच्चस्तरीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. या समितीने अपहाराचा ठपका ठेवत, पोलिस ठाण्यात फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एस. टी. भालेराव यांचेविरुद्ध पीव्हीसी पाइप गैरव्यवहाराचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. यात प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन २००४ ते २००९ दरम्यान, तत्कालीन प्रकल्पाधिकारी भालेराव यांनी शासन निर्णय २००९ मधील कार्यप्रणालीचा भंग करून, शासन निर्णयाप्रमाणे लाभार्थींना पीव्हीसी पाइप वाटप न करता, बेकायदेशीर मार्गाने पीव्हीसी पाइप यांची विल्हेवाट लावली. यात ५ लाख २१ हजार ९९१ रुपयांचा गैरव्यवहार करून शासनाची फसवणूक करीत, आर्थिक नुकसान केले. म्हणून त्यांचे विरोधात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांचे मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र खैरनार, हवालदार संजय तायडे तपास करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain: मुंबईत संततधार! चार धरणं ओव्हरफ्लो; सातही जलाशयांची आकडेवारी समोर

WTC Final 2027 Venue: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल कुठे होणार? भारतीय संघ पात्र ठरू शकणार का? ICC ची घोषणा...

Crime News: शाळेत १० रुपये चोरल्याचा आरोप; रागात शिक्षिकेकडून मारहाण, घरी येताच १० वर्षीय मुलीनं जीवन संपवलं

Latest Marathi Update : धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावरील देवभाने फाट्यावर रास्ता रोको आंदोलन

Rahul Gandhi Protest : PM निवासस्थानाबाहेर घातपात करायचा होता का?; एकनाथ शिंदेंनी 'या' दोन माजी पंतप्रधानांचा दाखला देत राहुल गांधींवर डागली तोफ

SCROLL FOR NEXT