Two per cent discount on petrol-diesel Two per cent discount on petrol-diesel
Uttar Pradesh Assembly Election 2022

Special Offer : पेट्रोल-डिझेलवर मिळणार दोन टक्के सूट; कराव लागणार हे काम

सकाळ डिजिटल टीम

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) भरण्यावर दोन टक्के सूट मिळणार आहे. या सूटचा लाभ घेण्यासाठी फक्त मतदान करावे लागणार आहे. लखनऊमध्ये सध्या पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही खास ऑफर देण्यात आली आहे. (Two per cent discount on petrol-diesel)

लखनऊ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सांगितले की, राज्याच्या राजधानीत मतदानाचे चिन्ह दाखविल्यास लोकांना डिझेल (Diesel)-पेट्रोलवर दोन टक्के सूट मिळेल. पेट्रोल (Petrol) पंपाच्या व्यवस्थापक सुनीता दीक्षित यांनी सांगितले की, लोकांना सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ही सूट देण्यात येणार आहे. हा उपक्रम लोकांना आवडला आणि त्यामुळे मतदानाचा टक्काही वाढेल. म्हणजेच बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी सहा या वेळेत पेट्रोल आणि डिझेल भरण्यावर ही सूट मिळेल.

उत्तर प्रदेश (uttar Pradesh) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) चौथ्या टप्प्यासाठी बुधवारी (ता. २३) मतदान पार पडणार आहे. चौथ्या टप्प्यात पिलीभीत, खेरी, सीतापूर, हरदोई, उन्नाव, लखनऊ, रायबरेली, बांदा आणि फतेहपूर येथे मतदान होणार आहे. उत्तर प्रदेशच्या नऊ जिल्ह्यांतील ५९ जागांवर मतदान होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price Hike: इंधनाचे दर पुन्हा वाढले! बुधवारी मध्यरात्रीपासून नवीन दरवाढ लागू; पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी

SRH vs RR Eliminator IPL 2026: वैभव सूर्यवंशीने मोडले ९ विक्रम... एकाच खेळीत इतके पराक्रम... Orange Cap ही केली नावावर

Pune News : मोठी बातमी! कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सारसबाग राहणार दोन दिवस बंद

Latest Marathi News Live Update : जनगणनेला नकार देणाऱ्या ८०० कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार

Vaibhav Sooryavanshi Records: १२ षटकार, ५ चौकार! वैभवची Fastest IPL Century हुकली; २९ चेंडूंत ९७ धावांवर OUT; जयसूर्याचा विक्रम मात्र मोडला

SCROLL FOR NEXT