akola sakal
विदर्भ

हिंगणघाट : आश्रमशाळेत १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, अधीक्षकाला अटक

चंद्रपूर येथील निवासी आश्रमशाळेत घटना घडली

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) - निवासी आश्रमशाळेत शिक्षणासाठी घातलेल्या १३ वर्षीय चिमुरडीवर आश्रमशाळेच्या अधीक्षकाने अत्याचार केला. ही घटना चंद्रपूर येथील निवासी आश्रमशाळेत घडली. या प्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांत गुन्हा नोंद करत आश्रमशाळेतील अधीक्षक संजय इटनकर (वय ५३) याला अटक करण्यात आली.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे कुटुंब गत दोन महिन्यांपूर्वी हिंगणघाट शहरात राहायला आले. मुलांच्या शिक्षणात बाधा येऊ नये म्हणून कुटुंबीयांनी त्यांच्या मुलीला चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या एका आश्रमशाळेत सात जुलैला दाखल केले होते. मुलीचे वडील हिंगणघाट येथे एका कंपनीत कामाला आहेत. पत्नीला त्यांच्या मूळ गावात आरोग्यासंबंधी त्रास होत असल्याने गाव सोडून हिंगणघाट येथे राहण्यास आले होते. दरम्यान, मुलीची प्रकृती ठीक राहत नसल्याचे कारण समोर करत मुलीचा दाखला घेऊन जाण्यासंदर्भात पीडित मुलीच्या वडिलांना आश्रमशाळेतून अधीक्षकाचा फोन आला. मुलीच्या कुटुंबीयांनी मुलीला घरी आणले. परंतु, मुलगी काहीच बोलत नसल्याने तिच्याशी अनुचित प्रकार घडला असल्याचा संशय आला. पीडित मुलीला घेऊन तिची आई व घरमालकीण यांनी हिंगणघाट पोलिस ठाणे गाठले व घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकरणी पोलिसांनी अत्याचार व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवत आरोपीला अटक केली. यावेळी आमदार समीर कुनावार, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेश कदम, प्रभारी पोलिस निरीक्षक प्रशांत काळे, महेंद्र इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक पाटणकर, टापरे हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले होते.

या प्रकरणात दिवसभर व रुग्णालयात हजर होतो. पीडित मुलीला न्याय देण्यासाठी म्हणून प्रयत्नशील आहे. संबंधित आश्रमशाळेची मान्यता रद्द करण्यासाठीदेखील पाठपुरवठा करणार आहे. हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयाची मागील तीन महिन्यांपासून रुग्णांसोबत डॉक्टरांच्या वागणुकीच्या तक्रारी येत आहेत. याबाबतदेखील वरिष्ठांकडे तक्रार करणार आहे.

- आमदार समीर कुणावार.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoffs Scenario: कोलकाताचे आव्हान संपुष्टात? गुजरात टायटन्सकडून दारूण पराभव, Point Table मध्ये मोठा बदल

GT vs KKR Live: शुभमन गिलची वादळी खेळी! विराट कोहलीकडून हिसकावली ऑरेंज कॅप; वैभव सूर्यवंशी टॉप फाईव्हमधून बाहेर गेला

AOR कोण आहेत, ज्यांना AI च्या वापराबाबत सरन्यायाधीशांकडून मिळाला इशारा; म्हणाले, विश्वास महत्त्वाचा!

Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा

Women Reservation Bill: महिला आरक्षण विधेयक पडलं, पण संपलं नाही! आता मंजुरीसाठी सरकार कोणती रणनीती आखणार? ‘हे' ५ पर्याय गेमचेंजर ठरणार

SCROLL FOR NEXT