विदर्भ

३ कोटी ३३ लाखांनी फसवणूक; कर बुडविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : कोट्यवधींची खरेदी-विक्री करून शासनाने आकारलेला कर चुकवून तीन कोटी ३३ लख २० हजार ८५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजापेठ ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. विजयकुमार किसन तायडे असे शासनाची फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्याचे नाव आहे.

विजयकुमार याने मे. शिवाजी ट्रेडिंग कंपनी या नावाने प्रतिष्ठान स्थापन करून २१ सप्टेंबर २०१६ पासून आर्थिक व्यवहार केला. राज्याचे अमरावती येथील सहायक कर आयुक्त ए. एस. अढाव यांनी सदर प्रकरणी पोलिसात तक्रार नोंदविली. विजयकुमार तायडे याने दसरा मैदान, हनुमान मंदिर या परिसरात सदर नावाने व्यवसाय करीत असल्याबाबतचे दस्तऐवज प्रशासनाकडे सादर करून ऑनलाइन पद्धतीने त्याबाबतची मूल्यवर्धीत कराची (वॅट) नोंदणी केली होती. परंतु, नोंदणी केल्यानंतर बरेच दिवस कोणत्याही प्रकारचा व्यवसाय केला नाही.

१ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवाकर कायदा जीएसटी अंमलात आल्याने पुन्हा तशा स्वरूपाची नोंदणी केली. त्यावेळी स्वत:चा फोटो आणि उत्तम ठाकरे नामक व्यक्तीच्या वीजदेयकाची प्रत ऑनलाइन नोंदणी करताना अपलोड केली होती. त्यानंतर विजयकुमार तायडे याने १ जुलै २०१७ ते ३१ मार्च २०१८ मध्ये जवळपास ६६ कोटी ७६ लाख ८८ हजार ९१६ रुपये एवढ्या रकमेच्या मालाची खरेदी-विक्री केली. त्यावर इंट्रीग्रेट कर म्हणून ३ कोटी १७ लाख ८५ हजार १८७ रुपये नोंद (वजावट) घेतली.

१ एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ या कालावधीत तायडे याने स्थापन केलेल्या कंपनीच्या माध्यमातून ३ कोटी २२ लाख ३२ हजर ८५२ रुपये मालाची विक्री करून त्यावरचा १५ लाख २४ हजार ९८९ रुपयांची नोंद (वजावट) घेतली. अशाप्रकारे शासनाची दिशाभूल करून ३ कोटी ३३ लाख २० हजर ८५ रुपये एवढ्या रकमेची शासनाची फसवणूक केली, असे सहायक विक्रीकर आयुक्त ए. एस. अढाव यांनी राजापेठ ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत स्पष्ट केले आहे.

प्रकरण आर्थिक गुंतागुंतीचे आहे. शिवाय फसवणुकीची रक्कमही तीन कोटींवर असल्यामुळे सदर प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला.
- मनीष ठाकरे, पोलिस निरीक्षक, राजापेठ ठाणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND W vs ZIM W: श्री चरणीची भेदक गोलंदाजी; झिम्बाब्वेचा डाव आटोपला, भारतासमोर किती धावांचं लक्ष्य?

Baramati News : निवडणूक पदवीधरची....बारामतीचे राजकारण ढवळून निघाले...

Marathi News Live Updates: FDA चा औषध विक्रेत्यांना दणका; राज्यात २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

Shri Someshwar Sugar Factory : सोमेश्वरच्या सभासद-कामगारांची दिवाळी झाली गोड! 90 कोटींच्या रकमा खात्यावर वर्ग; सभासदांना उर्वरित बिल तर कामगारांना बोनस जमा

Pune News : दिवाळीत फटाके उडविताना घ्या खबरदारी; अग्निशामक दलाकडून सुरक्षिततेची नियमावली

SCROLL FOR NEXT