विदर्भ

Buldhana Bus Accident : बुलढाण्यात दोन खासगी बसेसची समोरासमोर धडक; सहा जणांचा मृत्यू, २५ जण जखमी

रोहित कणसे

Buldhana Bus Accident : बुलढाणा जिल्हातील मलकापूर येथे दोन खाजगी बसचा भीषण अपघात झाला आहे. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती झालेल्या या भीषण अपघातात दोन ट्रॅव्हल्स समोरासमोर धडकल्या असून या अपघातात सहा प्रवाशांचा मृत्यू तर 25 ते 30 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक सहा वर दोन ट्रॅव्हलचा समोरासमोर धडकल्याची घटना आज सकाळी तीन वाजेच्या सुमारास लक्ष्मी नगर उड्डाण पुलावरती घडली. या धडकेत सहा प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे समजते. तर 25 ते 30 प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.

सहा जणांचा जागीच मृत्यू

एम.एच 08. 9458 ही ट्रॅव्हल्स अमरनाथ येथून हिंगोलीच्या दिशेने जात होती. या बसमध्ये 35 ते 40 तीर्थयात्री प्रवास करत होत. तर नागपूर वरून नाशिकच्या दिशेने जात असलेल्या एम.एच 27 बी.एक्स. 4466 या ट्रॅव्हल्समध्ये 25 ते 30 प्रवाशी होते. दरम्यान मलकापूर शहरातून जाणाऱ्या हायवे क्रमांक 6 वरती समोरासमोर धडक बसल्याने या बसेसचा भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की यामध्ये दोन्ही बस चिरडल्याचे पाहायला मिळाले. या दुर्घटनेत सहा जणांचा जागीच मृत्यू झालाय तर दोन्ही ट्रॅव्हल्स मधील ते 20 ते 25 प्रवासी जखमी आहेत.

या घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस निरीक्षक अशोक रत्नापारखी, दसरखेड एम.आय.डी.सीचे पोलीस निरीक्षक यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांसहित घटनास्थळी जाऊन मदत कार्य सुरू केले. जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बुलढाणा येथे हलवण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे तर मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ICC ODI World Cup 2027 India Fixture: रोहित शर्मा, विराट कोहलीचा शेवटचा वर्ल्ड कप! पण, भारताचे सामने किती वाजता सुरू होणार? कुठे Free पाहता येणार?

Pune Teamperature : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उकाड्याचे चटके; तापमान सरासरीपेक्षा एक-दोन अंशांनी अधिक राहण्याचा अंदाज

Dapoli News : दाभोळजवळ शिकारीदरम्यान बंदुकीचा मिसफायर; एकाचा मृत्यू, एक जखमी

Pune News : पुणे महापालिका आयुक्तांचा यूटर्न; ५०० वॉर्डनच्या निविदेला स्थगिती

Ghansangavi Crime : जिरडगाव येथील हॉटेलमालकाचा खून सख्ख्या भावानेच जमिनीच्या वादातून केल्याचे निष्पन्न; आरोपी भावासह दोन जण जेरबंद

SCROLL FOR NEXT