accident 
विदर्भ

चारचाकी व ट्रकच्या धडकेत 4 ठार, 3 गंभीर जखमी

विरेंद्रसिंग राजपूत

नांदुरा (बुलडाणा) : अल्पवयीन मुलीस पळवून आणणाऱ्या आरोपीस व त्यांच्यासह त्यांच्या 4 नातेवाईकांना घेऊन जाणाऱ्या सिंगरोल (म.प्र.) च्या पोलिस वाहनाला समोरून येणाऱ्या ट्रकने जबरदस्त धडक दिल्याने पोलिसांच्या झायलो कारमधील चार जण जागीच ठार झाले, तर 3 गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता. 14) सकाळी 5 वाजेदरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील धानोरा नजीक घडली आहे. ओव्हरटेक करताना झायलो कार नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ट्रकवर आदळली तेव्हा हा अपघात एवढा जबरदस्त होता की, झायलो कार हवेत उडाली व मागून येणाऱ्या फोर्ड फिगो कारवर आदळली. सुदैवाने फोर्ड फिगोतील प्रवासी सुखरूप बचावले.

मध्यप्रदेशातील इंदोर जिल्ह्यातील सिमरोल पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या गावातील अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून अपहरण केल्याप्रकरणी बोरगाव मंजू येथील आरोपीला अटक करून नेत असताना मलकापूर पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर धानोरा (वि) झायलो गाडीला भरधाव कंटेनरने जबर धडक दिल्याने झायलो कार फोर्ड फिगो वर आदळून झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार तर सिमरोल पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक दीपक मंडलोइ व पोलिस हवालदार दीपक मनोजसह आरोपी रोहित अविनाश रायबोले हे तिघे गंभीर जखमी झाले.

तर ठार झालेल्या दोघांची ओळख पटली असून त्यात सुनील गौरीशंकर परदेशी, मनोज रामकृष्ण खरेबिन यांचा समावेश आहे. अपघात एवढा भीषण होता की कर मधील चालकास बाहेर काढण्यात एक तास लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

New Income Tax: 1 एप्रिलपासून नवा Income Tax नियम! पगार, घर-गाडी, गिफ्ट, PF वर आता आकारला जाणार कर; जाणून घ्या 7 मोठे बदल

Latest Marathi News Live Update : झोजी ला खिंडीत जोरदार हिमवृष्टी

Tejaswini Sangale Death : सुवर्णपदक विजेती खेळाडू मृत्यूशी झुंज हारली! राष्ट्रीय खो-खो पटू तेजस्विनी सनगलेचे वयाच्या 18 व्या वर्षी निधन, अपघातात मेंदूला...

Solapur LPG Misuse: साेलापूरात घरगुती गॅस वापरणाऱ्या व्यावसायिकांवर गुन्हे; अन्नधान्य वितरण विभागाचे छापे, हॉटेल व्यावसायिक रडारवर!

USA Drone Threat: अमेरिकेच्या मंत्र्यांच्या घरावर ड्रोन; लष्करी तळावर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, 'एफबीआय’चा काय इशारा!

SCROLL FOR NEXT