police 
विदर्भ

परेडला जाताना पोलिस जीपला अपघात

राजेश सोळंकी

आर्वी (जि. वर्धा) : साप्ताहिक परेडसाठी विरूळ रसुलाबाद मार्गे वर्धा येथे जात असताना वादळी वाऱ्याने रस्त्यावर पडलेल्या झाडाला वळसा घालण्याचा प्रयत्नात पोलिस जीप उलटली. या अपघातात सात पोलिस कर्मचारी व अधिकारी गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (ता. 7) पहाटे पाच वाजून 20 मिनिटांनी नांदुरा (काळे) येथे घडली.

जखमीपैकी एका पोलिस अधिकाऱ्याळा अमरावती येथील रेडिएन्ट हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले तर उर्वरित कर्मचाऱ्यांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाणेदार संपत चव्हाण (वय 52), वाहन चालक प्रमोद राऊत (वय 52), फौजदार गोपाळ ढोले (वय 32), अमोल बर्डे (वय 31),  सुनील मलनकर (वय 30),  सुरेश कांदे (34),  रवींद्र खेडेकर (वय 31) यांचा जखमीत समावेश आहे. आर्वी-वर्धा मार्गावर चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे विरूळ-रसुलाबाद मार्गे वर्धा येथे परेडला जाण्यासाठी सकाळी पाच वाजता पोलिस ठाण्यातून रवाना झाले. नांदुराजवळ गुरुवारी (ता. सहा) आलेल्या वादळी पावसाने झाड पडले होते. अंधारात ते चालकाला दिसले नाही. परिणामी, झाडाला धडक बसून जीप उलटली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या निर्णयानंतर सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! मुंबई-पुण्यात सोनं किती रुपयांना?

Konkan Railway : CM फडणवीसांचं पत्र अन् राणेंचा दिल्लीत पाठपुरावा! सावंतवाडी टर्मिनसवर 'राजधानी'सह 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर, रेल्वेमंत्र्यांनी काय केली घोषणा?

Marathi News Live Updates: मंत्रालयासमोर झाडावर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन, सरसकट कर्जमाफीसह हमीभावाची मागणी

Chhatrapati Sambhajinagar: ज्ञानमंदिराच्या वाटेवर कडेवरच्या कसरती!; वरद विद्या मंदिरकडे जाणारा रस्ता खड्डे, चिखलाने माखल्याने पालक त्रस्त

IND vs ENG: भारताला ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीपूर्वी धक्का! प्रमुख फलंदाज संघातून बाहेर, बदली खेळाडूची BCCI कडून घोषणा

SCROLL FOR NEXT