action will be taken if the weapon is purchased online 
विदर्भ

सावधान! ऑनलाइन शस्त्र खरेदी केल्यास होणार कारवाई

संतोष ताकपिरे

अमरावती : ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या माध्यमाने धारदार शस्त्रे विकली जातात. ती गुन्ह्यातसुद्धा वापरली जाण्याची भीती वाढली आहे. अशी शस्त्रे ऑनलाइन साइटवरून खरेदी केल्याची बाब पुढे आल्याने अशाप्रकारची शस्त्रे खरेदीवर पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून त्यावर प्रतिबंध करण्यासाठी बुधवारी (ता. 16) एक आदेश पारित केला. 

या आदेशान्वये सदर कंपन्यांच्या माध्यमातून तीक्ष्ण असलेले प्राणघातक शस्त्र ज्याच्या पात्याची लांबी नऊ इंचापेक्षा जास्त किंवा ज्याची रुंदी दोन इंचापेक्षा जास्त आहे ते बाळगणे हे भारतीय हत्यार कायद्याच्या कमल 4 सहकलम 25 अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. अशा शस्त्रविक्रीवर शहरात बंदी घालण्यात आलेली आहे.

शस्त्रे बाळगता ज्यांची लांबी नऊ इंचापेक्षा कमी व रुंदी दोन इंचापेक्षा कमी असलेल्या शस्त्राची ऑनलाइन खरेदी करणाऱ्या अमरावती शहरातील ग्राहकांची तपशीलासह माहिती शहर पोलिसांना वेळोवेळी पुरविण्याबाबत आदेश देण्यात आले. हा आदेश दहाही ठाण्यांच्या हद्दीकरिता लागू आहे. अशाप्रकारची ऑनलाइन शस्त्रे विक्री करणाऱ्या कंपन्यांना नोटीस बजावण्यात आल्याचे पोलिस आयुक्तांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bailgada Sharyat: वेग, ताकद अन् जिद्दीला अखेरचा निरोप! पुणे जिल्ह्यात दबदबा असलेल्या ओम्या बैलाचं निधन

Raksha Bandhan 2026: पौर्णिमा 9:47 ला संपणार, मग राखी बांधायची कधी? ‘हे’ 3 मुहूर्त ठरतील खास

BMC Politics: मुंबई महापालिकेत सत्ताबदलाची नांदी! सव्वावर्ष शिंदेसेनेचा महापौर बसणार? भाजपला धक्का देण्याची तयारी; ‘मिशन टायगर’ची चर्चा

Marathi News Live Updates : जर आमच्या निदर्शनास आले की कोणी हिंदीत बोलत आहे किंवा उद्धटपणे वागत आहे, तर आम्ही त्यांना मारू - अमित ठाकरे

Pune Traffic Issue : वाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती; ‘रिअल टाइम डेटा’नुसार होणार अभ्यास

SCROLL FOR NEXT