Akola Agriculture University will now form 'entrepreneurs', the government will provide financial assistance of up to Rs 25 lakh
Akola Agriculture University will now form 'entrepreneurs', the government will provide financial assistance of up to Rs 25 lakh 
विदर्भ

कृषी विद्यापीठ करेल आता 'उद्योजकांची' घडवणूक, सरकार देईल २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य

अनुप ताले

अकोला  : डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आता 'उद्योजक' घडविले जाणार आहेत. त्यासाठी विद्यापीठाच्या उत्कर्ष ॲग्री बिझनेस इंक्युबॅशन सेंटरद्वारे प्रशिक्षण दिले जाणार असून, उपक्रमांतर्गत प्रशिक्षणार्थींना केंद्र सरकारद्वारे २५ लाख रुपयांपर्यंतचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, राष्ट्रीय कृषी विकास योजना भारत सरकार नवी दिल्ली अंतर्गत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे 'ॲग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर (राबी)'ची स्थापना करण्यात आली आहे. हे इनक्यूबेशन सेंटर (राबी) महाराष्ट्रातील युवा वर्गासाठी एक सुवर्णसंधी ठरणार आहे. केंद्र सरकारच्या दृष्टिकोनातून हा उपक्रम राबविताना, शेतीतून येणाऱ्या उत्पन्नासोबतच शेती पूरक उद्योगाला चालना देणे, कृषी क्षेत्रात तरुणांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करणे व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना वाव देऊन त्यांचे उद्योगात रूपांतर करून व्यवसाय निर्मितीला चालना देण्यासाठी यामाध्यमातून प्रोत्साहन दिले जाणार आहे.

योजना डॉ. एस. जे. गहूकर, मुख्य अन्वेशक (ॲग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर) हे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले, डॉ. पी. जी. इंगोले अधिष्ठाता (कृषी) यांचे मार्गदर्शनाखाली राबवत असून, डॉ. ए. एन. पासलावार सह-अन्वेशक (राबी), एन. एस. गुप्ता सह-अन्वेशक (राबी) हे यासाठी सहकार्य करीत आहेत.

अशी आहे योजना व उद्दिष्ट
या योजनेंतर्गत नव उद्योजक व युवकांसाठी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये नव्याने कृषी व कृषी आधारित उद्योग सुरुवात करण्यासाठी प्री-सीड स्टेज फंडींग प्रोग्राम व असलेल्या ऊत्पादन/सेवा या उद्योगात रूपांतरीत करण्यासाठी सीड स्टेज फंडींग प्रोग्रामचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांतर्गत नवउद्योजक व युवकांना मार्गदर्शन केले जाईल. कृषी व कृषी आधारित नावीन्यपूर्ण कल्पनांना उद्योगात रूपांतरित करण्यासाठी प्रशिक्षण देऊन पाच लाख रुपयांपर्यंतचे तसेच कृषी क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या ऊत्पादनांसाठी २५ लाख रुपयांपर्यंतचे आर्थिक सहाय्य पुरविणे या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

इनक्यूबेशन सेंटरतर्फे मिळतील या सुविधा
या योजनेअंतर्गत निवड झालेल्या नव उद्योजकांना ऍग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटरतर्फे आठ आठवड्याचे प्रशिक्षण, विशेष तज्ञांचे सविस्तर मार्गदर्शन, औद्योगिक आधार, उत्कृष्ठ तांत्रिक मार्गदर्शन, इंनक्यूबेशन सुविधा, पायाभूत सुविधा, कृषी व व्यवसाय क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन या सुविधा पुरवण्यात येणार आहेत.

कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत ही योजना राबवली जात आहे. या योजनेची अधिक माहिती www.utkarshrabiakola.com किंवा www.pdkv.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, ग्रामीण भागातील शेतकरी व नव उद्योजक तरुणांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन ॲग्री बिझनेस इनक्यूबेशन सेंटर (राबी)चे मुख्य अन्वेशक डॉ.एस.जे. गहूकर यांनी केले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT