file photo 
विदर्भ

तळीरामांचा वैताग  : नशा करण्यासाठी सॅनिटायझरचा वापर 

तुषार अताकरे

वणी (यवतमाळ) : 'लॉकडाउन'मुळे मद्य, सिगारेट, तंबाखू आदी नशाजन्य पदार्थ मिळत नसल्याने तळीरामाचा वैताग वाढला आहे. नशेसाठी ते आता मिळेल त्या साधनांचा वापर करू लागले आहे. निर्जंतुकीकरणासाठी वापराता येत असलेल्या सॅनिटायझरचा वापर नशा करण्यासाठी व्यसनी लोकांकडून केला जात आहे. गुरुवारी वणीत सॅनिटायझरचा नशा म्हणून वापर करणाऱ्या एका युवकाचा मृत्यू झाल्याने ही गोष्ट अधोरेखीत झाली आहे. 

लढवली नवीन शक्कल

'लॉकडाउन' वाढल्यामुळे काही दिवस दारूची दुकाने बंद होती. सुरू केली तेव्हा अनेक मर्यादा घालण्यात आल्या. शिवाय, दरम्यानच्या काळात दारूचे भावही गगणाला भिडले. दीडशे रुपयाचा पव्वा पाचशेला विकला जाऊ लागला. त्यामुळे तळीरामांचा वैताग वाढला. एवढा खर्च करून ते दारू विकत घेऊ शकत नव्हते. त्यासाठी त्यांनी नवीन शक्कल लढवली. कोरोनामुळे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सॅनिटायझर सर्रास वापरले जाऊ लागले. घरोघरी सॅनिटायझर वापरले जाऊ लागले. या सॅनिटायझरमध्ये 70 ते 90 टक्के अल्कोहोलचे प्रमाण असल्याने काहींनी तर नसेसाठीच याचा वापर करणे सुरू केले आहे. 


 प्रकृती बिघडून उपचारादरम्यान मृत्यू

येथील रंगारीपुऱ्यात वास्तव्यास असलेल्या 25 वर्षीय युवकाने सॅनिटायझर नशा म्हणून प्याल्याने प्रकृती बिघडून त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे व्यसनाधीन युवक नशा करण्यासाठी सॅनिटायझरचासुद्धा वापर करीत असल्याची बाब अधोरेखीत झाली आहे. तंबाखू, सिगारेट मिळत नसल्याने अनेकांचा तिळपापड होत आहे. तर नशेसाठी गांजा ओढला जात आहे. शहरातील निर्जनस्थळी युवकांचे टोळके गांजा घेताना दृष्टीस पडतात. तर, काही युवक तर टायर पंक्‍चर दुरुस्त करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सोल्यूशनचा वापर नशेसाठी करीत आहेत. ही बाब आरोग्याच्या दृष्टीने अतिशय घातक असून यामुळे जीवसुद्धा जाऊ शकतो, असे डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. 
 

सॅनिटायझरमध्ये 70 ते 90 टक्के अल्कोहोल असते. ते शरीरासाठी घातक आहे. सध्या उन्ह वाढत आहे. तापमान 40 अंश सेल्सीअसपर्यंत वाढले आहे. अशा परिस्थितीत शरीरात पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवणे गरजेचे आहे. परंतु, अशा प्रकारच्या नशेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन डिहायड्रेशन होण्याची भीती असते. या स्थितीत जीवसुद्धा जाऊ शकतो. अशा पद्धतीची नशा करणे चुकीचे आहे. मन शांत ठेवण्यासाठी नागरिकांनी योगा, प्राणायाम करावा.' 
-डॉ. सचिन दुमोरे,जनरल फिजिशिएन, वणी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT