आर्वी ः निम्न वर्धा धरणात तयार झालेल्या बेटावर मुक्कामी ठेवलेल्या म्हशी. 
विदर्भ

आर्वी : अस्थायी बेटाची दूधदुभत्याला संजीवनी;120 म्हशी ठेवल्या मुक्कामी

राजेश सोळंकी

आर्वी (जि. वर्धा) : तालुक्‍यातील निम्न वर्धा धरणात बॅकवॉटरमुळे तयार झालेले बेट चार कल्पक युवकांच्या दुग्ध व्यवसायाला नवसंजीवनी देणारे ठरले आहे. या युवकांनी स्वमालकीच्या 120 म्हशींना धरणाच्या पात्रातून पोहत बेटावर नेले. हे युवक नावेने बेटावर जातात आणि दूधसंकलन करून त्याचे परिसरात वाटप करतात. या व्यवसायाकरिता त्यांनी खास नाव विकत घेतली आहे. या युवकांची कल्पकता आणि धाडसाबद्दल त्यांचे पंचक्रोशीत सर्वत्र कौतुक केले जात आहे.
संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडारे व भारत मानकर रा. बोरगाव (हातला) अशी या युवकांची नावे आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित शेती आहे, म्हशी आहेत; पण चारा नाही. तालुक्‍यात वैरणाची तीव्र टंचाई आहे. त्यामुळे गुराढोरांचे काय करायचे, असा प्रश्‍न गोपालक, शेतकऱ्यांपुढे उपस्थित झाला. यावर उपाय शोधत या चार युवकांनी निम्न वर्धा धरणात निर्माण झालेल्या बेटाची निवड केली. तिथे 120 म्हशी नेऊन त्यांच्यासाठी नैसर्गिक सकस आहाराची सोय केली. नियोजनानुसार त्यांनी नावेला बांधून काही म्हशी तिथे नेल्या. उर्वरित म्हशी पाण्यात सोडून त्यांच्या मागे पोहत-पोहत बेटावर नेल्या. म्हशींना मुबलक प्रमाणात हिरवा चारा उपलब्ध झाला, पाण्याचाही प्रश्‍न मिटला; मात्र तेथे राहण्याचा, राखण करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला. म्हशी परत तेथून पाण्यात येऊ शकत नसल्याने त्यांची राखण करण्याची काळजी मिटली. त्यानंतर दररोज सकाळ, संध्याकाळ पोहत बेटावर जाणे, दूध काढणे, ते आणणे या कामांचे आव्हान उभे ठाकले. या युवकांनी एक नाव विकत घेतली. नाव कशी व्हलवायची हे शिकून घेतले. आता हे युवक सकाळी साडेपाच वाजता गावातून दुचाकीने किनाऱ्यावर येतात. त्यांना नावेने बेटावर जाण्यास एक तास लागतो. बेटावर गेल्यावर म्हशीचे दूध काढतात. दररोज सुमारे 100 लिटर दूध संकलित होते. म्हशींना हिरवा चारा मिळत असल्याने दूध चांगल्या प्रतीचे असते.
गरजेतून शोध
तालुक्‍यातील निम्न वर्धा धरणाने 24 गावे उजाड झाली. अडीचहजार हेक्‍टरमध्ये हे धरण आहे. त्यात पुरेसा पाणीसाठा आहे; मात्र पाणी आटताच तिथे हिरवीगार बेटे तयार झाली. 25-25 एकरांचे हे दोन बेटे असून, आजूबाजूला पूर्ण पाणी आहे; नांदुरा (काळे) गावापासून सात किमीवर हे बेट आहे. उन्हाळ्यात चाऱ्याच्या शोधात असताना संदीप आंबुडारे, गुड्डू वाळके, सचिन आंबुडरे, भारत मानकर यांना हे बेट गवसले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या निर्णयानंतर सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! मुंबई-पुण्यात सोनं किती रुपयांना?

Konkan Railway : CM फडणवीसांचं पत्र अन् राणेंचा दिल्लीत पाठपुरावा! सावंतवाडी टर्मिनसवर 'राजधानी'सह 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर, रेल्वेमंत्र्यांनी काय केली घोषणा?

Marathi News Live Updates: मंत्रालयासमोर झाडावर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन, सरसकट कर्जमाफीसह हमीभावाची मागणी

Chhatrapati Sambhajinagar: ज्ञानमंदिराच्या वाटेवर कडेवरच्या कसरती!; वरद विद्या मंदिरकडे जाणारा रस्ता खड्डे, चिखलाने माखल्याने पालक त्रस्त

IND vs ENG: भारताला ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीपूर्वी धक्का! प्रमुख फलंदाज संघातून बाहेर, बदली खेळाडूची BCCI कडून घोषणा

SCROLL FOR NEXT