विदर्भ

अत्याचारानंतर ठार मारण्याची धमकी; नवविवाहितेची छेडखानी

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : परतवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गावात अल्पवयीन मुलीवर (वय १५) बळजबरीने अत्याचार केला, तर अन्य घटनेत त्याच ठाण्याच्या हद्दीत नवविवाहितेचा विनयभंग केला. तसेच तळेगाव दशासर हद्दीत अल्पवयीन मुलीचे अपहरण करून छेडखानी करण्यात आली.

परतवाडा ठाण्याच्या हद्दीतील गावात अल्पवयीन मुलगी (वय १५) ही घरात झोपली असताना संशयित कैलास मोहन शनवारे (वय २२) याने घरात प्रवेश करून बळजबरीने अत्याचार केला. घटनेबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास किंवा घडलेल्या घटनेसंदर्भात पोलिसांत तक्रार दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली, असा आरोप पीडितेने परतवाडा ठाण्यात दिलेल्या तक्रारीत केला.

अत्याचार होऊनही दिलेल्या धमकीमुळे पीडित घाबरल्याने तिने दोन दिवस त्याबाबत कुणाकडे सांगितले नाही. अखेर हिंमतीने तिने आईला तिच्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. त्यानंतर आईने पीडितेसह परतवाडा ठाणे गाठून संशयित कैलास शनवारे विरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी कैलासविरुद्ध अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा व ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

परतवाडा ठाण्याच्या हद्दीतच अन्य दुसऱ्या गावातील नवविवाहिता (वय २१) घराबाहेर गेली असताना परिसरातील संशयित रावजी लालमन जामूनकर (वय ३५) याने तिचा पाठलाग करून तिला गाठले व ‘तू मला खूप आवडते’, अशी इच्छा रावजी याने नवविवाहितेपुढे व्यक्त केली. याबाबत कुणाला सांगू नये म्हणून पीडितेला रावजी याने धमकी दिली, असा आरोप नवविवाहितेने परतवाडा पोलिसात दाखल तक्रारीत केला.

तळेगाव दशासर ठाण्याच्या हद्दीत एका गावातील अल्पवयीन मुलगी (वय १४) शाळेत जात असताना संशयित चंद्रशेखर सुरेश हाडके (वय २५) याने दुचाकीने पाठलाग केला. रस्त्यात अडवून व बळजबरीने दुचाकीवर बसवून दुसऱ्या एका गावापर्यंत नेले. मध्येच कुणाचा तरी फोन आल्यामुळे संशयिताने युवतीला पुन्हा शाळेपर्यंत आणून सोडले. चंद्रशेखरने आपला विनयभंग केला, असा आरोप पीडितेने तक्रारीत केला. प्रकरणी तळेगाव दशासर पोलिसांनी संशयित चंद्रशेखर हाडकेविरुद्ध विनयभंग व पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT