Balpur panchayat samity, fraud by citizens 
विदर्भ

खुर्च्या खाली, अन्‌..कर्मचारी फरार

सकाळ वृत्तसेवा

बाळापूर (जि.अकोला) : रिकाम्या असलेल्या खुर्चा... नाहक सुरुच असलेली विजेची उपकरणे... कार्यालयात पसरलेली स्मशान शांतता व आल्या पावली परतत असलेले नागरीक. अशी परिस्थिती बाळापूर पंचायत समितीत फेरफटका मारल्यास दृष्टीस पडते. "दालनाला कुलूप व कर्मचारी फरार" अशी स्थिती पंचायत समितीत निर्माण झाली आहे. 

पंचायत समितीच्या कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी कामानिमित्त बाहेर गेल्यास तेथील बहुतेक कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळत नाही, त्यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होतो, बाळापूर पंचायत समितीत हि धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या पंचायत समितीत अधीकाऱ्यांचे अनेक पदे रिक्त आहेत व पंचायत समितीचा संपूर्ण कारभार प्रभारींच्या खांद्यावर असून उरले सुरलेले कर्मचारी व अधिकारी दौरा, मिटींगच्या नावाखाली कार्यालयाला नियमित दांडी मारत असून पंचायत समिती कार्यालयात नेहमीच ठणठणाट असतो. या कारभारामुळे नागरिक वैतागले आहेत. विशेष म्हणजे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी हे देखील गैरहजर असल्याचे नागरिक सांगतात त्यामुळे वरिष्ठांकडूनही या विषयी कारवाईसंदर्भात कुठलीही ठोस पावले उचलली जात नाहीत. मंगळवारी (ता. 25) गटविकास अधिकाऱ्यांचा टेबल रिकामा होता. मात्र ते दौऱ्यावर असल्याचे सांगण्यात आले. तेथील कर्मचारी आपल्या खुर्चीवर आढळले नाही, त्यामुळे शासकीय कामाचा खोळंबा होत असल्याचे उघड होते. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या कृषी विभाग, आरोग्य विभाग, शिक्षण विभाग, रोजगार हमी, पाणी पुरवठा विभाग अशा बहुतांश कार्यालयातील कर्मचारी टेबलवरुन बेपत्ता असल्याचे दिसून आले. या पंचायत समितीअंतर्गत एकूण 36 ग्रामपंचायती आहेत. संबंधित गावातील नागरिक आपली कामे घेऊन येथे येतात. परंतु कर्मचारी कामावर उपस्थित असून सुद्धा ते आपल्या टेबलवर दिसत नाहीत. दिवसभर प्रतीक्षा करूनही त्यांना काम न होता निघून जावे लागते. ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना अकारण आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.


पंचायत समितीत दलालांचा सुळसुळाट 
शासनस्तरावरील योजनांची माहिती ग्रामीण भागातील जनतेला ग्रामपंचायती द्वारा पुरेपूर दिल्या जात नसल्यामुळे दलालांचे फावते आहे. दलालांच्या माध्यामातून लाभार्थ्यां योजनांचा लाभ देण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत. पंचायत समिती ही शासन व नागरिकांचा महत्त्वपूर्ण दुवा आहे. अनेक योजनांची माहिती ग्रामीण नागरिकांना राहात नाही व कुठल्या योजनेला कोणते कागदपञे लागतात याची सुद्धा नेमकी माहिती नागरिकांना राहात नाही. मध्यस्थीद्वारे योजनांचा लाभ लाभार्थ्यांना, दलाला मार्फत दिल्या जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. 

कार्यवाही करू
पंचायत समितीत कर्मचारी व अधीकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. तोकड्या कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण येत आहे. काही कर्मचारी दौऱ्यावर असतात. अधिकारी व कर्मचाऱ्यांची मागणी आम्ही जिल्हा परिषदेकडे केली आहे. तर पंचायत समितीत येऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या दलालांची गय केली जाणार नाही. 
- रुपाली गवई, सभापती, पंचायत समिती बाळापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

आगमन मिरवणुकीत पुन्हा अपघात! ट्रॉली उलटल्याने गणेशमूर्ती कोसळली; अंगावर शहारा येणारा Video Viral

BRICS Summit 2026 : एकाच शक्तीचं कायम वर्चस्व शक्य नाही’; BRICS मध्ये जिनपिंग यांची अमेरिकेवर टीका, पंतप्रधान मोदींचे मानले आभार

Marathi News Live Updates : आखाती देशांना इराणसोबत करार करायचा असेल, तर त्यांनी तो करावा- डोनाल्ड ट्रम्प

Ganeshotsav Security : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोहोळ व शेटफळमध्ये पोलिसांचे पथसंचलन; गुन्हेगारांचे धाबे दणाणले

SCROLL FOR NEXT