bhagwatkar maharaj pandurang raut sakal
विदर्भ

Accident : भागवतकार महाराज यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु

लाखांदूर तालुक्यातील मेंढा/चप्राड येथील रहिवासी व परिसरात भागवतकार व कीर्तनकार म्हणून सुपरिचित असलेले पांडुरंग राऊत महाराज (वय-६०वर्ष) यांचे अपघातात दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज घडली.

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर - तालुक्यातील मेंढा/चप्राड येथील रहिवासी व परिसरात भागवतकार व कीर्तनकार म्हणून सुपरिचित असलेले पांडुरंग राऊत महाराज (वय-६०वर्ष) यांचे अपघातात दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना आज सांयकाळी ६.३० वाजे दरम्यान लाखांदुर-चप्राड रस्तावर चप्राड पहाडी जवळ घडली.

पांडुरंग महाराज काही कामानिमित्त लाखांदुरला गेले होते. काम आटोपून मेंढा या स्वगावी स्कुटीने परत येत असतांना चप्राड पहाडीजवळ अज्ञात वाहनाची धडक लागुन सिमेंट रस्त्यावर पडले. बराच वेळ घटनास्थळी पडुन राहले, काही वेळानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालय लाखांदुर येथे उपचारार्थ भरती करण्यात आले. माञ डाँक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

पांडुरंग महाराजचे मुळगाव सोनी येथील असुन बर्याच वर्षापासुन मेंढा येथे वास्तव्यास राहत होते. ते वर्षभर धार्मिक कार्यात मग्न राहत असत. परीसरात धार्मिक कार्य त्यांच्या हस्ते पार पडत असत, त्यांच्या अचानक अपघाती मृत्युने त्यांच्या अनुयायी व कुटुंबावर सोनी, चप्राड, मेंढा या गावावर शोककळा पसरली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT