Bhandara Gang rape of young woman 
विदर्भ

भंडारा : लाखांदुरातील बदनाम लॉजमध्ये युवतीवर सामूहिक अत्याचार

शहरात खमंग चर्चा; पोलिसांनी घेतली दखल

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर : येथील एका लॉजवर प्रेमियुगुल अश्‍लील चाळे करत असल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, प्रियकराने प्रेयसीला विश्वासात घेऊन मद्यपान करायला लावले. त्यानंतर नशेतील युवतीवर दबा धरून असलेल्या तीन ते चार मित्रांनी सामूहिक अत्याचार केल्याची चर्चा आहे. या चर्चांची लाखांदूर पोलिसांनी दखल घेतली असून, प्रियकर व प्रेयसी तसेच त्या चार व्यक्ती कोण, याचा शोध घेणे सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, विहीरगाव येथील ३५ वर्षीय युवकाने पवनी येथील त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी लाखांदूर येथे लॉजवर बोलावले. या घटनेचा युवकाच्या मित्रांना सुगावा लागला. त्यांनी शोधाशोध सुरू केली. ते दोघेही लॉजमध्ये थांबले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्याचे मित्र लॉजवर धडकले. खोलीचा दरवाजा तोडून आत शिरलेल्या मित्रांनी पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या युवकाला बेदम मारहाण केल्याची चर्चा आहे. तसेच युवतीचा विनयभंग केल्याचे सांगण्यात येत आहे.

या लॉजवर प्रियकर आणि प्रेयसी येऊन चाळे करतात, ही बाब नित्याचीच झाली आहे. दरम्यान, याच आठवड्यात एका प्रेयसीला शीतपेयामधून मादक पदार्थ देऊन बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर तीन-चार जणांनी अतिप्रसंग केल्याचीसुद्धा चर्चा येथे सुरू आहे. या घटनेची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. पोलिसांनी याची दखल घेऊन तपास सुरू केला आहे. हा घटनाक्रम तपासात घेतला असून, दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. तसेच नियमबाह्य चालवीत असलेल्या लॉजवरसुद्धा नियमानुसार कारवाई केली जाईल.

-रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक, लाखांदूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT