crime news esakal
विदर्भ

भंडारा : मतिमंद युवतीवर अत्याचार प्रकरणात आरोपीला १० वर्षांची शिक्षा

लाखांदूर पोलिस ठाणेअंतर्गत गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : लाखांदूर पोलिस ठाणेअंतर्गत खैरीपट येथे मतिमंद युवतीवर अत्याचारातील आरोपी भिमराव छाबिलदास गायकवाड (वय ३५) याच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने अतिरीक्त व सत्र न्यायाधीश पी. एस. खुने यांनी त्याला १० वर्षे सश्रम कारावास व दंडाची शिक्षा ठोठावली. याबाबत अधिक माहिती अशी की, खैरी पट येथील फिर्यादी महिलेच्या घरी तिची आई व मतिमंद असलेली पिडीत मोठी बहीण राहते. आठ जानेवारी २०१६ रोजी आरोपी भिमराव गायकवाड हा शेळया सोडण्याकरिता त्यांच्या घरी आला. तेव्हा पीडिता घरी एकटीच असल्याचे पाहुन त्याने तिला पैशाचे आमीष दाखविले होते. परंतु, तिने पैसे घेण्यास नकार दिला. तेव्हा त्याने घरात येवून पीडितेवर जबरदस्तीने अत्याचार केला.

याबाबत पीडितेने तिची आई व बहीण यांना घडलेल्या प्रसंगाबाबत सांगितले. त्यावरून बहीण व आई यांनी पीडितेसोबत घेवून लाखांदूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून पोलिसांनी आरोपी भिमराव छाबिलदास गायकवाड यांच्या विरुद्ध अत्याचाराचा गुन्हा गुन्हा नोंदविला. पोलिस उपनिरीक्षक अनिल के. कुमरे यांनी गुन्हयाचा तपास करून आरोपी भिमराव गायकवाड याला तत्काळ अटक करून गुन्ह्यातील साक्षीपुरावे गोळा केले. गुन्ह्यात आरोपी विरुद्ध सबळ पुरावे मिळाल्याने त्याच्याविरुध्द प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय तथा विशेष न्यायालय, भंडारा येथे आरोपपत्र दाखल केले.

या गुन्ह्याची सुनावणी अतिरीक्त व सत्र न्यायाधीश पी. एस. खुने यांच्या न्यायालयात चालवली. सरकार पथातर्फे जिल्हा सरकारी अभियोक्ता श्रीमती दुर्गा तलमले यांनी शासनातर्फे बाजू मांडून गुन्ह्यातील साक्षपुरावे योग्य प्रकारे सादर करून साक्षीदार तपासले. यात आरोपीविरूद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयानेे बुधवारी आरोपी भिमराव छाबिलदास गायकवाड १० वर्षांची शिक्षा व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात पोलिस हवालदार प्रदीप राऊत यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम केले.

सरकारी वकिलांची कौशल्यपूर्ण मांडणी

न्यायालयात या गंभीर गुन्ह्याच्या खटल्यात सुनावणीदरम्यान सरकारी वकिल ॲड. दुर्गा तलमले यांनी साक्षदार तपासले. पोलिसांनी मिळवलेले पुरावे, उलट तपासणीत कौशल्यपूर्ण मांडणी केल्यामुळे आरोपीवर अत्याचाराचा गुन्हा सिद्ध झाला आहे. आरोपीला शिक्षा होण्यासाठी सरकारी अभियोक्त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT