Seven children poisoned after eating Jatropha seeds 
विदर्भ

जट्रोफाच्या बिया खाल्ल्याने सात बालकांना विषबाधा

विरेंद्रसिंग राजपूत

नांदुरा (बुलडाणा) : नांदुरा तालुक्यातील तांदुळवाडी येथील शालेय विद्यार्थ्यांनी गावशेजारी असलेल्या जट्रोफा या झाडाच्या बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाली.

या सातही विद्यार्थ्यांना मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याबाबत सविस्तर असे, की आज स्वातंत्रदिन असल्याने दुपारनंतर शाळेला सुट्टी होती. या सुट्टीच्या काळात काही विद्यार्थी गावाजवळीलच महादेवाच्या मंदिराजवळ सुट्टीचा आनंद घेण्यासाठी गेले होते.

या मंदिराशेजारीच जट्रोफाची काही झाडे आहेत. १२वर्षांआतील या बालकांना ही झाडे विषारी असतात याबाबत कल्पना नव्हती. त्यांनी या झाडाच्या बिया दुपारनंतर खाल्ल्यावर यातील ७ जणांना उलट्या व जुलाबचा त्रास जाणवू लागला. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी या प्रकाराची सखोल चौकशी केल्यानंतर जट्रोफा या झाडाच्या बिया खाल्ल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले. त्यांना ताबडतोब जवळच असलेल्या मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या सातही विद्यार्थ्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khadakwasla Dam Water : खडकवासला धरणसाखळीत ३३ टक्के पाणीसाठा; गतवर्षीपेक्षा चार टक्क्यांनी पाणीसाठा अधिक

मोठी बातमी! कर्जमाफीसाठी बॅंकांना विचारली शेतकऱ्यांची जात; 'सहकार'ने सरकारला दिली ५४ रकान्यातील माहिती; मेअखेर मंत्रिमंडळात निर्णय अन्‌ ‘या’ तारखेपूर्वी लाभ

Maharashtra Day celebration : शिवनेरीवरील सुवर्णक्षणांना उजाळा; सह्याद्रीच्या पुढाकाराने जुन्नरमध्ये दरवर्षी महाराष्ट्र दिन सांस्कृतिक महा उत्सव

IPL 2026 Orange Cap : संजू सॅमसन गरजला! ख्रिस गेलचा १३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला, ऑरेंज कॅपच्या शर्यतीत निर्णायक वळण

West Bengal : ममतांचा राजीनाम्यास नकार, भाजपचा मुख्यमंत्री कसा होणार? राज्यपालांकडे काय पर्याय?

SCROLL FOR NEXT