संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

रुग्णालयाचा गलथान कारभार, रुग्णाचे नावच नोंदविले नाही

संतोष ताकपिरे

अमरावती : एका जखमी व्यक्तीचे केसपेपर तयार होते, पण त्याचे नाव नोंदणी रजिस्टरमध्ये नव्हते. वीस तासानंतर त्या व्यक्तीचा उपचारादरम्यान इर्वीन रुग्णालयात शनिवारी मृत्यू झाला. त्यानंतरच शहर कोतवाली पोलिसांच्या हालचाली सुरू झाल्या. त्यामुळे इर्विनचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला.

सुरेश पुंडलिक पेंदोर (वय ४०, रा. गांधीआश्रम, अमरावती) असे उपचारादरम्यान मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास इर्वीन रुग्णालयाजवळच्या भापकर कॉम्प्लेक्‍सजवळ एका जनरल स्टोअर्स समोर प्रवासी ऑटोने एका व्यक्तीला धडक दिली. जखमीस काहींनी उपचारासाठी इर्वीनमध्ये दाखल केले. त्या व्यक्तीचा केसपेपर तयार केले. परंतु रुग्णाची नोंद येथील रजिस्टरमध्ये केली नाही. नोंदीनंतर केसपेपर तयार होतात. त्यावर निदानाचा उल्लेख असतो. अपघात, हाणामारी किंवा संशयास्पद मृत्यू असल्याचे लक्षात येताच, ओपीडीमधुनच पोलिस चौकीत मेमो पाठविल्या जातो. परंतु या रुग्णाबाबत तसे काहीच झाले नाही.

ओपीडीमध्ये दाखल व्यक्ती कोण हे समजायला वीस तास लागले. शनिवारी त्या व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने त्याला नागपूरला हलविण्यात आले. दरम्यान, वाटेतच त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने मृतदेह दुपारी तीन वाजून दहा मिनीटांनी इर्वीनमध्ये आणल्यावर त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यूनंतरच त्यांचा मेमो रुग्णालयातून चौकीत तर सायंकाळी साडेपाच वाजता ठाण्यात पोचला. त्यानंतर चौकशी सुरू झाली. मृत व्यक्तीच्या खिशात असलेले आधार कार्डावरुन त्याच्या नातेवाइकांना बोलविण्यात आले. मृत व्यक्ती सुरेश पेंदोर असल्याचे शिक्कामोर्तब झाले. या घटनेतून इर्वीन रुग्णालयाचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला. मृत व्यक्तीची पत्नी संगीता सुरेश पेंदोर यांनी कोतवाली ठाण्यात तक्रार केली असता, गुन्हा दाखल झाला.

रुग्णालय प्रशासनाला दिले जाईल पत्र
घटना गंभीर असल्याने शुक्रवारीच मेमो येणे अपेक्षित होते. तातडीने पोलिसांना गुन्हा दाखल करता आला असता. परंतु मेमोसाठी इर्वीनमधुनच विलंब झाला. त्यासंदर्भात रुग्णालय प्रशासनाला पत्र देऊन माहिती घेतल्या जाईल. असे पोलिस उपनिरीक्षक श्री. चाटे यांनी सांगितले.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 : MS Dhoni च नाही तर कोलकाता नाईट रायडर्सच्या 'या' तीन खेळाडूंसाठी यंदा शेवटचं आयपीएल?

नवी मुंबई एअरपोर्टचा मोठा धमाका! ४६ नव्या शहरांसाठी उड्डाणांची घोषणा; उन्हाळी वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या मार्ग...

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Narayangaon News : मोफत शस्त्रक्रियेमुळे शेतमजूर तरुण विवाहितेचे अंधकारमय जीवन झाले प्रकाशमय

IPL 2026 Marathi News: मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये जाणारच! ड्यू प्लेसिस ते इरफान पठाण, १२ एक्सपर्टची भविष्यवाणी; तुमचे टॉप ४ कोणते?

SCROLL FOR NEXT