Cheating of tourists in the name of travel
Cheating of tourists in the name of travel 
विदर्भ

सावध व्हा... परदेशात सहलीच्या नावावर होऊ शकते फसवणूक; अंजनगावसुर्जीत घडला प्रकार

गजेंद्र मंडलिक

 अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) :  थायलंड - बॅंकॉक सहलीच्या नावावर पर्यटकांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अंजनगावसुर्जी पोलिसांनी डॉ. नंदकिशोर अरुण पाटील (वय 30) व विनोद अरुण पाटील (वय 32, दोघेही रा. शहापुरा, अंजनगाव) यांना अटक केली.
 
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानव सेवा विकास फाउंडेशन संस्थेमार्फत थायलंड येथील सहलीचे आयोजन अंजनगावसुर्जी येथील नंदकिशोर अरुण पाटील व त्याचा भाऊ विनोद अरुण पाटील यांनी 16 जून 2019 रोजी केले होते. प्रतिव्यक्ती चाळीस हजार रुपये याप्रमाणे एकूण 41 पर्यटकांचे पैसे त्यांनी स्वतःच्या अकाउंटला जमा केले होते.

ठरलेल्या तारखेप्रमाणे एकूण 41 पर्यटक विदेशातील सहलीकरिता मुंबई विमानतळावर जमा झाले असता सहल आयोजित करणारे डॉ. नंदकिशोर पाटील व विनोद पाटील हे दोघेही विमानतळावर उपस्थित नसल्याने पर्यटकांमध्ये शंका निर्माण झाली. 

लगेच पर्यटकांनी नंदकिशोर पाटील याच्याशी संपर्क केला असता पर्यटकांचे कॉल रिसिव्ह न करता सदर सहल काही तांत्रिक कारणामुळे रद्द झाल्याचे व आपले पैसे आठ दिवसांत परत करण्याचे मॅसेज पाठवले. परंतु पर्यटकांचे कोणतेही पैसे आजपर्यंत परत न मिळाल्याने अखेर यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील एक पर्यटक राजूसिंग धनसिंग जाधव (वय 62) व रजनी काळमेघ (रा. जरुड) यांनी अंजनगाव पोलिस ठाणे गाठून डॉ. नंदकिशोर पाटील, विनोद पाटील यांच्याविरुद्ध बुधवारी (ता. 21) तक्रार दाखल केली.

त्यावरून विदेशातील सहलीच्या आयोजनाखाली फसवणूक करणारे व विमानाचे बनावट तिकीट तयार करणारे नंदकिशोर पाटील आणि विनोद पाटील यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली. पोलिसांनी त्यांना न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने त्यांना 27 ऑक्‍टोबरपर्यंत पोलिस कस्टडी दिली. ठाणेदार राजेश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश जवरे याप्रकरणाची सखोल चौकशी करीत असून यामध्ये अनेक आरोपी निघण्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली आहे. 

संपादन  : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सकाळी नऊ वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; महाराष्ट्रात सर्वात कमी मतदान

Fact Check: 'गर्दी फक्त पाहायला येते, मतदानाला नाही...' खोट्या दाव्यासह कंगनाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Hybrid Pitch In Dharamshala : हायब्रिड खेळपट्टी म्हणजे काय? धरमशालामध्ये करण्यात आले अनावरण! मुंबईसह 'या' मैदानावर लवकरच होणार प्रयोग

Latest Marathi News Live Update : अमित शहांनी बोरिवलीमध्ये भाड्याने घर घेतलंय- संजय राऊत

IPL 2024 DC vs RR : राजधानी 'दिल्ली'साठी आर या पार...! प्लेऑफमध्ये टिकून राहण्यासाठी आज राजस्थानवर विजय आवश्यक

SCROLL FOR NEXT