Nana Patole 
विदर्भ

Nana Patole: ''स्वत:ला संत समजू नका''; नाना पटोलेंचे कार्यकर्त्याने धुतले पाय; पाहा व्हिडिओ

viral video Nana Patole: नाना पटोलेंनी एका कार्यकर्त्याकडून आपले पाय धुऊन घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

कार्तिक पुजारी

मुंबई- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर विरोधकांनी सध्या टीकेचे झोड उठवली आहे. नाना पटोलेंनी एका कार्यकर्त्याकडून आपले पाय धुऊन घेतल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून यावरून पटोलेंना विरोधकांनी घेरलं आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यामधील ही घटना आहे. पटोले जिल्ह्यातील वाडेगाव येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांचे पाय चिखलाने माखले होते. त्यावेळी एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय धुतले आहेत. त्यामुळे विरोधकांना टीकेसाठी चांगला मुद्दा मिळाला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी यावरून पटोलेंवर निशाणा साधला आहे.

अशा प्रकारचे कृत्य करून पक्षाची काय धारणा आहे हे लक्षात येतं. ही अत्यंत संतापजनक घटना आहे. नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुऊन घेणे हा लोकशाहीचा आणि कार्यकर्त्याचा अपमान आहे. नाना पटोलेंनी स्वत:ला संत समजू नये. विशेष म्हणजे त्यांनी कार्यकर्त्याला नोकर समजू नये. कार्यकर्त्यांनी सुद्धा समजून घ्यावं की लोकशाहीमध्ये कोणी मालक नसतो. ही केवळ सत्तेची मस्ती आहे का असा सवाल मिटकरी यांनी विचारला आहे.

नेमकं काय झालं?

नाना पटोले वाडेगाव येथे मुक्कामी असलेल्या संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. पालखी नानासाहेब चिंचोळकर विद्यालयाच्या मैदानावर थांबली होती. पावसामुळे मैदानात मोठा चिखल झाला होता. नाना पटोलेंनी चिखलातून मार्ग काढत संत गजानन महाराज पालखीचे दर्शन घेतले. यावेळी नानांचे पाय चिखलात माखले होते. ते गाडीजवळ आल्यानंतर एका कार्यकर्त्याने त्यांचे पाय पाण्याने धुतले.

विजय गुरव असं या कायकर्त्याचे नाव असून तो बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील रहिवाशी आहे. गुरव हे काँग्रेसचे, विशेषत: नाना पटोलेंचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या या कृतीमुळे नाना अडचणीत सापडले आहेत. विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puri Rath Yatra: जगन्नाथ पुरीच्या रथयात्रेत अचानक गर्दी अन् चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, शंभर भाविक जखमी झाल्याची माहिती

UP Farm Scheme: शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! यूपीमध्ये कृषी यंत्रांवरील अनुदानासाठी आजपासून ऑनलाइन बुकिंग सुरू

IND VS ENG 2ND ODI: विराट कोहलीचा विश्वविक्रम! मोडला श्रीलंकेच्या महान फलंदाजाचा विक्रम; सचिन, धोनी यांनाही सोडले मागे

Shivalay Park: अवघ्या ५० रुपयांत करा भारताच्या नकाशावर '१२ ज्योतिर्लिंगांसह' प्रमुख शिवदर्शन! प्रयागराजमध्ये साकारला भव्य 'शिवालय पार्क'

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

SCROLL FOR NEXT