Contract workers protest in Sakoli  sakal
विदर्भ

Sakoli : कंत्राटी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन,दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर धरणे सुरू

Contract workers protest : साकोलीमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य न झाल्याने कामबंद आंदोलन सुरू केले; ‘उमेद’ विभागाची स्वतंत्र मान्यता आणि नियमित सेवा प्रदान करण्याची मागणी. दोन दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर धरणे सुरू आहे.

सकाळ वृत्तसेवा

साकोली : उमेदचे अधिकारी, कर्मचारी यांनी मागण्या मान्य न झाल्याने गुरुवारपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

‘उमेद’ राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेने २०११ पासून आजपर्यंत उमेद हा स्वतंत्र विभाग करावा. त्या अंतर्गत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमित पदावर सामावून घ्यावे, या मागण्यासंदर्भात शासनाकडे सतत पाठपुरावा केला. तरी देखील या मागण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. दोन ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्याने गुरुवारपासून राज्यभर काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय रविवारी संघटनेच्या अधिवेशनात घेण्यात आला होता.

त्यानुसार तीन ऑक्टोबरला साकोली येथील उमेद कर्मचारी यांनी उमेद अभियानला ग्रामविकास व पंचायतराज विभागांमधील शासनाचा नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देण्यात येऊन कार्यरत सर्व कंत्राटी कर्मचारी, कर्मचारी आणि समुदाय संसाधन व्यक्ती यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेण्यात यावे.

याकरिता गटविकास अधिकारी यांना काम बंद आंदोलनाचे निवेदन दिले. पंचायत समितीसमोर कामबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी अश्विन बनसोड, कमलेश फरकुंडे, विनोद शिंदे, सोनम पाझरे, स्नेहा खाडे, अर्चना बडोले, विवेक राऊत, संघटना सचिव पुष्पा नागोसे, उपाध्यक्ष पौर्णिमा झिंगरे व सर्व साकोली तालुका कॅडर उपस्थित होते.

आज, शुक्रवारीही उमेद कर्मचाऱ्यांचे मागण्या मान्य न झाल्यामुळे पुन्हा पंचायत समिती येथे कामबंद आंदोलन करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray News : राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन, लवकरच गुड न्युज; कृष्णकुंजवर भेटीसाठी दिल निमंत्रण

Your Money: ऑनलाइन शॉपिंगमध्ये पैसे अडकले? ‘Refund will be processed shortly’ म्हणत कंपनी टाळाटाळ करतेय? मग असा मिळवा रिफंड!

तेव्हा सोनाली बेंद्रेंकडून मिळालं होतं बक्षीस, आता त्यांच्यासमोरच केला डान्स; प्राजक्ता माळीला ओळखणं ही कठीण

Maharashtra Live News : राज्यातील आणखी ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्र्यांची माहिती

Kumbh Mela 2026: हरिद्वार कुंभमेळा २०२७ चा बिगुल वाजला; लोगो, अधिकृत वेबसाइट अन् कुंभगीताचे लोकार्पण

SCROLL FOR NEXT