file photo 
विदर्भ

"एफआयआर'ची प्रत ड्यूटी ऑफिसरच्या स्वाक्षरीशिवाय

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : घरात घुसून मुलीची छेड काढणाऱ्यांच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी अजनी पोलिसांनी केवळ धमकीचा "अदखलपात्र' गुन्हा दाखल केला. इतकेच नव्हे तर पीडितेला दिलेल्या "एफआयआर'च्या प्रतीवर ड्यूटी ऑफिसरच्या नावाचा उल्लेख कुठेही दिसत नसल्याने प्रकरण संशयाच्या भोवऱ्यात अडकले आहे.
अजनी भागात घडलेल्या या प्रकरणात पोलिसांनी आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप पीडितेने केला होता. त्यानंतर पोलिस आयुक्तालयाने दखल घेत प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. शुक्रवारी सहायक पोलिस आयुक्तांनी पीडितेची चौकशी केली. त्यानंतर अजनी पोलिसांना बयान नोंदवून आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आणि पीडितेला एफआयआरची प्रत देण्याचे आदेश दिले. मात्र, पीडितेला दिलेल्या प्रतीवर ड्यूटी ऑफिसरचे नाव व सही कुठेही दिसत नाही.
पीडितेच्या मते, अजनी पोलिसांनी शनिवारी घटनास्थळी पंचनामा केला आणि "ऑन द स्पॉट' एफआयआरची प्रत दिली. यात कुख्यात गुंड मंगेश टिचकुले व लकी तेलंग यांना आरोपी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. मात्र, शनिवारी दिलेल्या एफआयआरवर अजनी ठाण्याचा केवळ ठप्पा आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Crime : हमाल नेत्याच्या नातवाचा गोळ्या घालून खून; रेल्वे मालधक्का ठेक्याच्या वादातून कुख्यात गुंडाचे कृत्य

Congress NCP Merger: काँग्रेसकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विलीनीकरणाचा प्रस्ताव?, तीन आमदार भाजपच्या वाटेवर?

Walchandnagar News : लासुर्णेच्या पृथ्वीराज मुळीक याचे सैन्यदलात भरतीचे स्वप्न साकार; लेफ्टनंटपदाच्या प्रशिक्षणासाठी झाली निवड

RBI च्या निर्णयाचा परिणाम! SBI आणि बँक ऑफ बडोदाकडून व्याजदरात वाढ; पण कोणत्या आणि किती?

गिग वर्कर्ससाठी मोठी खुशखबर! नवीन e-Shram पोर्टल झालं सुरू; २१ जूनपर्यंतच करता येणार नोंदणी, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

SCROLL FOR NEXT