nagpur esakal
विदर्भ

Crime News: फेसबुक मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार

सकाळ डिजिटल टीम

नागपूर: लग्नाचे आमिष दाखवून फेसबुक फ्रेण्डने ३७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली. सतीश पुरणलाल फरदे (रा. पॅराडाइस हिल, वाघधरा,हिंगणा) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला इमामवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहाते. नोव्हेंबर २०२०मध्ये फेसबुकद्वारे सतीशची महिलेसोबत ओळख झाली. दोघे चॅटिंग करायला लागले. त्याने महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

लग्नाचे आमिष दाखविले. बसस्थानकाजवळील लॉजमध्ये नेऊन तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी सतीशने लग्नास नकार दिला. महिलेने गणेशपेठ पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सतीशला अटक केली.

महिलेचा विनयभंगप्रकरणी

दरम्यान नागपूर सोनेगाव पोलिस हद्दीत राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला शिविगाळ आणि त्यांच्या वडिलांना जिवे मारण्याची धमकी देत, विनयभंग केला. याप्रकरणी आरोपी विनय सुभाष माटे (वय २८, रा. हजारी पहाड) याला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विनयचा ट्रव्हल्सचा व्यवसाय असून त्याची २०२० पासून महिलेशी ओळख आहे. त्याचा फायदा घेत, त्याने महिलेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो सातत्याने भेटण्यास बोलावित असताना, त्यांनी नकार दिला.

त्यामुळे त्याने तिला फोन आणि संदेश पाठविणे सुरू केले. दरम्यान ही बाब महिलेच्या वडिलांना कळताच, त्यांनीही त्याला हटकले. त्यातून त्याने घरी येत महिला आणि तिच्या वडिलांना शिविगाळ करीत, बघून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी त्यांनी सोनेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Amba Ghat Closed : कोल्हापुरातून कोकणात जाणारा आणखी एक मार्ग राहणार बंद, आंबा घाटात गॅस टँकर पलटला

Maharashtra Politics: अर्थखात्यासाठी राष्ट्रवादीची जोरदार लॉबिंग; चार महिन्यांनंतरही निर्णय रखडला, खाते परत मिळवण्यासाठी पक्ष आक्रमक

Indian Railways Hydrogen Train: देशातील पहिला प्रयोग हरियानात! डिझेलविना, प्रदूषणविरहित धावणार हायड्रोजन रेल्वे; रेल्वे मंत्रालयाचा हिरवा कंदील

मोठी बातमी! ग्रामपंचायतींचा नोव्हेंबरअखेर वाजणार बिगुल? सरपंच आरक्षण जाहीर, आता सदस्यांची आरक्षण सोडत १२ जूनला; मतदार यादी ‘या’ महिन्यात होणार अंतिम

येत्या जून महिन्यात बनतोय अत्यंत खतरनाक खप्पर योग ! रातोरात बदलणार नशीब; कुणाला शुभ तर कुणाला अशुभ घ्या जाणून

SCROLL FOR NEXT