crime Watermelon seller attacks youth with knife Lakhani vidarbha sakal
विदर्भ

भर पटात टरबूज विक्रेत्याने केला तरुणावर चाकूने वार

बैल गाडीच्या शर्यतींची मेजवानी सुरू आहे, सेलोटी येथे शर्यतीचे आयोजन केले

अभय भुते

लाखनी : तालुक्यातील सेलोटी शंकर पटाचे आयोजन करण्यात आले होते. शंकरपटा दरम्यान टरबूज विक्रेत्याने युवकावर चाकूने हल्ला केल्याची घटना शनिवारी ता. १२ ला सायंकाळच्या सुमारास घडली. जखमीस जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. श्यामू /यशवंत नीलकंठ वकेकार वय २५ रा.माडगी/ टेकेपार असे आहे.तर शुभम नरेश गायधने वय 25 राहणार गणेशपुर भंडारा असे मारेकऱ्याचे नाव असून त्याला गावकऱ्यांनी लाखणी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

तालुक्यात सध्या बैल गाडीच्या सर्यतींची मेजवानी सुरू आहे. या मध्येमातुन सेलोटी येथे शर्यतीचे आयोजन केले होते. श्यामू /यशवंत नीलकंठ वकेकार ज्यांनी आपली बैलजोडी शंकर पटात आणली होती असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले तर शुभम गायधने याने शंकर पटात टरबूज विक्री करिता आणले होते. दरम्यानच्या काळात शुभम गायधने याने चाकूने श्यामू /यशवंत नीलकंठ वकेकार ज्याच्या पायाच्या मांडीवर व पाठीवर चाकूने वार केले यात श्यामू /यशवंत नीलकंठ वकेकार हे रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळले बघता-बघता घटनास्थळी गर्दी जमा झाली आयोजन समिती व नागरिकांनी जखमीला लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले तर उपस्थित नागरिकांनी मारेकरी शुभम गायधने याला चोप दिला. व पोलिसांच्या स्वाधीन केले.

घटनेची माहिती लागणे पोलिसांना देण्यात आली असून पोलीस उपनिरीक्षक दिलीप कुमार घरडे आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले असून जखमी श्यामू /यशवंत नीलकंठ वकेकार याला कर्तव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे प्रथमोपचार करून जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे घटनेची नोंद वृत्त लिहीपर्यंत करण्याची कार्यवाही सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT