Death of old man due pesticides for threatening to get involved in false crime yavatmal esakal
विदर्भ

खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकीमुळे कीटकनाशक प्राशन केलेल्या वृद्धाचा मृत्यू

तब्बल १५ दिवस मृत्यूशी झूंज दिल्यानंतर अखेर रविवारी (ता. पाच) त्याचा मृत्यू झाला

सकाळ वृत्तसेवा

मारेगाव (जि. यवतमाळ) : मारहाण व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकीमुळे अपमानित झालेल्या वृद्धाने मारहाण करणाऱ्‍याच्या घरासमोर जाऊन विषप्राशन केले. तब्बल १५ दिवस मृत्यूशी झूंज दिल्यानंतर अखेर रविवारी (ता. पाच) त्याचा मृत्यू झाला. नानाजी देवराव धानकी (वय ६०, रा. टाकळखेडा) असे मृताचे नाव आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्‍यांवर कारवाई होईस्तोवर मृतदेह न हलविण्याची भूमिका संतप्त नातेवाईकांनी घेतली होती. मात्र, पोलिसांच्या मध्यस्थीनंतर मृतदेह हलविण्यात आला.

नानाजी धानकी यांनी आठ महिन्यांपूर्वी घराशेजारी राहणाऱ्या नात्यातीलच विलास रामचंद्र धानकी याला ५० हजार रुपये आठ दिवसांत परत करण्याच्या बोलीवर उसने दिले होते. परंतु विलासने ठरल्याप्रमाणे पैसे परत केले नाही. नानाजी वारंवार विलासकडे पैशाची मागणी करायचे. २२ मे रोजीही नानाजींनी विलासकडे पैशाची मागणी केली. मात्र, आम्ही पैसे देत नाही, असे म्हणून विलास, त्याची पत्नी चंद्रकला, मुलगा मयूर व विठ्ठल रांगणकर (रा. मारेगाव) यांनी नानाजीला मारहाण केली व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली.

मारहाणीमुळे व खोट्या गुन्ह्यात अडकविण्याच्या धमकीमुळे माझा अपमान झाला, मी आता जगून काय करू, असे बोलत नानाजीने कुटुंबीयांची नजर चुकवून विलास धानकी याच्याच घरासमोर जाऊन विष प्राशन केले. नानाजींच्या पत्नी, सुभद्राने गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना तत्काळ वणी येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर रविवारी रात्री ११ च्या सुमारास रुग्णालयात नानाजीचा मृत्यू झाला. सुभद्रा धानकी हिच्या तक्रारीवरून विलास धानकी, त्याची पत्नी चंद्रकला, मुलगा मयूर व विठ्ठल रांगणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT