The decomposed body of a missing person was found in Amravati 
विदर्भ

पत्नी व मुलाला माहेरी सोडून बहिणीकडे जातो असे सांगितले अन् परतलेच नाही, आठ दिवसांनी...

गजेंद्र मंडलिक

अंजनगावसुर्जी (जि. अमरावती) : अंजनगावसुर्जी तालुक्‍यात चिंचोली येथील शेताच्या धुऱ्यावर चार दिवसांपासून बेपत्ता व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळला. मृत व्यक्तीची ओळख पटली असून, मृत्यूचे नेमके कारण समजू शकलेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाम उर्फ अनिल माणिक पारे (वय ४५, रा. मलकापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मंगळवारी (ता. चार) रक्षाबंधनासाठी बहिणीच्या गावी जात असल्याचे सांगून शाम यांनी पत्नी व मुलाला माहेरी सोडून दिले. परंतु, शाम हे बहिणीच्या घरी गेलेच नाही. घरच्यांनी त्यांच्याबाबत विचारपूस केली असता आलेच नसल्याचे समजले.

मोठा भाऊ आशोक पारे यांनी शनिवारी (ता. आठ) शेतात जाऊन बघितले असता शाम उर्फ अनिल यांचा कुजलेला मृतदेह आढळला. तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्‍यता पोलिसांनी वर्तविली. मृतदेह कुजल्याने दुर्गंधी पसरली होती. शाम यांच्या शरीरावर मारहाण किंवा शस्त्राने वार केल्याची जखमी दिसली नाही. शवविच्छेदन अहवाल येणे बाकी आहे. घातपाताची शक्‍यता पडताळून बघू, असे पोलिस निरीक्षक शेख जमील यांनी सांगितले.

अमरावती : वलगाव जवळील आमला येथील नाल्याला आलेल्या पुरामुळे वाहून गेलेल्या तिघांपैकी दोघांचा शोध लागला असला तरी तिसरा व्यक्ती आठ दिवसांपासून बेपत्ता होता. अखेर रविवारी त्याचा शोध लागला. दोन ऑगस्टच्या मध्यरात्री चारजण वाहून गेल्याची घटना घडली होती. त्यातील एकजण त्यावेळी बचावला तर तिघे वाहून गेले. त्यातील दोघांचे मृतदेह त्यावेळी सापडले होते. परंतु, तिसऱ्याचा पत्ता लागत नसल्याने जिल्हा आपत्ती बचाव व शोध पथक त्याचा शोध घेत होते.

आठ दिवस घातली नदी पालथी

आठ दिवसांपासून नाला तसेच लगतची नदी पालथी घालण्यात आली. ड्रोन तसेच जेसीबीच्या मदतीने सुद्धा शोध घेण्यात आला. अखेर आज सावरखेड नजीकच्या चत्रपूर भागात सतीश भुजाडे यांचा मृतदेह आढळून आल्याचे बचाव पथकाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी तहसीलदार संतोष काकडे, नायब तहसीलदार दिनेश बडीये उपस्थित होते.

संपादन - नीलेश डाखोरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आंदोलनापुढे सरकार झुकलं? NTA मधील बदलांवर आज रात्री मोठी घोषणा होण्याची शक्यता

बांगलादेशात मोठा राजकीय उलटफेर! राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांचा राजीनामा; कार्यकाळ २०२८ पर्यंत असतानाही का पद सोडले?

Pune Tragedy: पुण्यातील भीषण अपघातात एमडी शिक्षण घेणाऱ्या डॉ. प्रशांत दासरवार यांचा मृत्यू

Pune Water Security: पुण्याच्या भविष्यातील पाणीसुरक्षेसाठी खडकवासला प्रकल्पातील धरणांतील गाळ काढण्यास संयुक्त समितीचा प्रस्ताव

Ahilyanagar Kalyan Highway: करंजाळे हद्दीत नव्याने बांधलेला अहिल्यानगर–कल्याण महामार्ग खचला; निकृष्ट कामावर संताप, ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT