lightning  sakal
विदर्भ

Lightning : वीज कोसळून संपूर्ण कुटूंबच ठार

सध्या राज्यात अवकाळी पावसाचे तांडव सुरू असताना देसाईगंज तालुक्यात वीज कोसळून संपूर्ण कुटूंबच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (ता. २४) सायंकाळी ५ वाजता घडली.

सकाळ वृत्तसेवा

सध्या राज्यात अवकाळी पावसाचे तांडव सुरू असताना देसाईगंज तालुक्यात वीज कोसळून संपूर्ण कुटूंबच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (ता. २४) सायंकाळी ५ वाजता घडली.

देसाईगंज (जि. गडचिरोली) - सध्या राज्यात अवकाळी पावसाचे तांडव सुरू असताना देसाईगंज तालुक्यात वीज कोसळून संपूर्ण कुटूंबच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवार (ता. २४) सायंकाळी ५ वाजता घडली.

वडसा-कुरखेडा मार्गावरील दूध डेअरी (तुळशी फाटा) जवळ वीज पडून संपूर्ण कुटूंबच ठार झाल्याची घटना घडली. भारत लक्ष्मण राजगडे (वय ३२) रा. आमगाव, ता. देसाईगंज, त्यांची पत्नी अंकिता भारत राजगडे (वय ३०) हे दोघेही पती-पत्नी आपल्या दोन्ही लहान मुलांसह गरगळा येथुन लग्न लावून येत असताना मार्गातच हलक्या पावसाची सुरुवात झाली. लगेच विजांचा कडकडाट सुरू झाला.

वीज कडाडत असल्याने राजगडे यांनी दूध डेअरी जवळ एका झाडाच्या खाली आश्रय घेतला. पण अचानक वीज अंगावर कोसळल्याने राजगडे कुटूंबातील चारही जण जागीच ठार झाले. या घटनेची माहिती मिळताच देसाईगंज पोलिसांनी घटनास्थळ गाठून चारही जणांचे मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात पाठविले. पुढील तपास पोलिस निरीक्षक रासकर यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT