विदर्भ

गोसेखुर्द झालेय वन्यप्राण्यांचे नवे कुरण, बॅकवॉटरमुळे पडीक जमिनीवर तयार होतेय नवे जंगल

शरद शहारे

वेलतूर, (जि. नागपूर) : गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरने परिसरात जंगली प्राण्याचा मुक्तविहार वाढला आहे. पेरणीअभावी ओस पडलेल्या शेतात वाढलेल्या गवतावर ससे, हरीण, सांबर, काळवीट यासारखे तृणभक्षी प्राणी आता मोठ्या प्रमाणात दिसू लागले आहेत. वन्यप्राण्यासाठी हे नवे कुरण त्यांच्या हक्काची जागा झाली तर वन्यजीवप्रेमी व अभ्यासकांमध्ये त्यांच्या मुक्त संचाराने आनंद संचारला आहे. 
सकाळी फिरायला जाणाऱ्यांना त्यांचे नियमित दर्शन होत आहे. त्याचे नियमित दर्शनाने अनेकांनी सकाळची मॉर्निंग वॉक जंगलातील पायवाटेकडे वळविली आहे. तर काही मुख्य कॅनल मार्गावर फेरफटका मारत आहेत. टेकेपार हरदोलीसह आंभोरा रस्ता ही सकाळी गजबजलेला असतो. चन्ना, सोनपुरी, कुजबा, पोहरा मार्ग जंगली जनावरांच्या दर्शनासाठी फार पूर्वीपासून प्रसिद्ध आहे. त्यातील शेतात व नाल्यालगतच्या भागात त्यांचे हमखास वास्तव्य असल्याचा अनेकांचा दावा आहे. त्याठिकाणी असलेला प्रतापपूरचा तलाव त्यांचा अधिवास असल्याने तिकडे ही सगळ्याचा राबता असतो. 

तृणभक्षी प्राण्यांची संख्या अधिक
पूर्वी वैनगंगा व आमनदी काठावरच्या जंगलात यांचा अधिवास होता. तो नदीघाट आता धरणात पूर्णत: बुडाला आहे. यामुळे बिथरलेली जनावरे दिसेनाशी झाली होती. आता ती परत दिसू लागल्याने वन्यजीवप्रेमींना हायसे वाटत आहे. परिसरात झुडपीप्रकारचे जंगल असल्याने तृणभक्षी प्राण्यांची संख्या अधिक आहे. रानडुकराचे प्रमाण तर खूपच आहे. त्यांचा उपद्रव मात्र शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडू लागला आहे. 

ओळख पुन्हा निर्माण होत आहे
पूर्वी मोठ्या प्रमाणात असलेली हरणांचे कळप येथील जंगलाची ओळख होती, ती ओळख पुन्हा निर्माण होत आहे. ही आनंदाची बाब आहे. - जीवन बोरसरे, वन्यजीवप्रेमी 

जल, जंगल, जमीन वाचविण्याचे प्रयत्न
वन्यजीव संवर्धन कार्यक्रमातून वनसमृद्धी येते व वनसमृद्धीतून आत्मनिर्भरतेचा मार्ग काढण्याची प्रेरणा म्हणून जल, जंगल, जमीन वाचविण्याचे प्रयत्न व्हावेत. 
- आकाश भोयर, सामाजिक कार्यकर्ता 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यात १७ वर्षांच्या मुलाची हत्या, पोलिसांनी भर पावसात काढली गुन्हेगारांची धिंड; मृताच्या आईने आरोपींना सर्वांसमोर चपलेने मारले

IND vs ZIM 1st T20I: भारतीय संघात पदार्पणासाठी ४ युवा खेळाडूंमध्ये स्पर्धा; वैभव सूर्यवंशीसारखा आक्रमक फटकेबाजी करणारा फलंदाज आघाडीवर, कशी असेल Playing XI?

Live Updates Marathi : विद्यार्थ्यांसोबत सरकार क्रूरपणे वागले, इंग्रज परवडले : उद्धव ठाकरे

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांचे टेन्शन वाढले! सलग तिसऱ्या दिवशी मोठी वाढ; चांदीही चमकली, पाहा ताजे भाव

जय-शरूमध्ये फुलणार प्रेमाचा बहर, 'सनई चौघडे' मालिकेतील प्रोमो पाहून नेटकरी म्हणाले, 'दोघांची केमिस्ट्री...'

SCROLL FOR NEXT