Elephant Sakal
विदर्भ

आता देसाईगंजपर्यत पोहोचले हत्ती

देसाईगंज तालुक्यात आधीच वाघाची दशशत असताना हत्तीच्या कळपाने प्रवेश केल्याने नवे संकट तालुकावासीयांसमोर उभे झाले आहे.

सकाळ वृतसेवा

देसाईगंज तालुक्यात आधीच वाघाची दशशत असताना हत्तीच्या कळपाने प्रवेश केल्याने नवे संकट तालुकावासीयांसमोर उभे झाले आहे.

देसाईगंज (जि. गडचिरोली) - छत्तीसगडमधून धानोरा मार्गे कुरखेडा तालुक्यात जंगली हत्तीच्या कळपाने प्रवेश करीत धुमाकूळ माजवला होता. आता हा कळप देसाईगंज वनविभागाच्या शंकरपूर वनपरिक्षेत्र कक्ष क्रमांक 103 मध्ये पोहोचला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

देसाईगंज तालुक्यात आधीच वाघाची दशशत असताना हत्तीच्या कळपाने प्रवेश केल्याने नवे संकट तालुकावासीयांसमोर उभे झाले आहे. हा हत्तीचा कळप रावणवाडी, टोली, बोळधा गावालगत असलेल्या जंगल परिसरात असल्याची माहिती असून शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसानही केले आहे.

हत्ती बघण्याकरिता नागरिक परिसरात धाव घेत असून वनविभागाच्या सुचनाकडे दुर्लक्ष केले जात आहे अशावेळी अनुचित घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा देखील प्रश उपस्थित होत आहे.

हत्तींच्या कळपावर वनपरिक्षेत्र अधिकारी विजय धांडे, क्षेत्र सहायक विजय कंकलवार तसेच वनरक्षक संदीप कानकाटे, सुनील कांबळे, राकेश आसलवार आदी लक्ष ठेवून आहेत. नागरिकांनी जंगलामध्ये जाऊ नये, असे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी धांडे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd ODI: रोहित शर्मा Is Best! सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली यांच्यानंतर परदेशात मैदान गाजवणारा तिसरा ओपनर

Maharashtra Politics : भेटींना राजकीय रंग देऊ नका; महायुती भक्कम असल्याचा कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांचा इशारा

Latest Marathi News Live Update : पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन बंद, कारण काय?

RBI Rule: बँकेच्या चुकीमुळे तुमचे नुकसान झाले? मग ग्राहकांना मिळू शकते 33 लाखांपर्यंत नुकसान भरपाई; जाणून घ्या नियम

IND vs ENG: विराट मोडणार सचिन तेंडुलकरचा १९ वर्षांचा जुना रेकॉर्ड? जे कोणालाच जमलं नाही ते विराट करणार, पाहा नेमकं काय घडणार

SCROLL FOR NEXT