विदर्भ

मुलीकडे गेलेल्या सासऱ्यांची जावयाने केली गोळी झाडून हत्या

- प्रकाश दुर्गे

अहेरी (जि. गडचिरोली) : अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात जावयाने सासऱ्यांची गोळी झाडून हत्या (Father in law shot dead) केली. ही घटना बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास घडली. मारोती मत्तामी (रा. खोरडा, ता. चामोर्शी) असे मृताचे तर मनोज गावडे असे जावयाचे नाव आहे. मनोज गावडे हा पोलिस दलात कार्यरत आहे. घटनेचा पंचनामा गुरुवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. (father-in-law-shot-dead-in-Gadchiroli-district)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी मारोती मत्तामी हे अहेरी येथे आपल्या मुलीला भेटायला आले होते. त्यांची मुलगी व जावयात कौटुंबिक वाद सुरू होता. तो सोडविण्यासाठी मारोती मत्तामी अहेरी येथील धर्मपुरी वॉर्डात मनोज गावडे याच्या घरी आले होते. रात्री दहा वाजताच्या सुमारास जावई आणि सासऱ्यात या विषयावरून वाद झाला आणि वाद विकोपास गेला. रागाच्या भरात मनोजने गोळ्या झाडल्या आणि सासऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

गोळ्यांचा आवाज येताच आजूबाजूचे लोक जागे झाले त्यांनी काय घडले याची माहिती घेतली असता जावयाने सासऱ्यावर गोळी झाडल्याचे समोर आले. लागलीच घटनेची माहिती अहेरी पोलिस ठाण्याला देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत मनोज गावडे याला ताब्यात घेतले. घटनेचा पंचनामा गुरुवारी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनात अहेरीचे पोलिस निरीक्षक प्रवीण डांगे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. या घटनेचा अधिक तपास अहेरी पोलिस करीत आहे.

(father-in-law-shot-dead-in-Gadchiroli-district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: दिल्लीच्या आंदोलनात पुन्हा हिंसा! तरुणांकडून दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Devala News : विवाहितेने दोन लहान मुलींसह गावाबाहेरच्या विहिरीत उडी टाकून संपविले जीवन

Sonam Wangchuk: रुग्णालयातून सोनम वांगचुक यांचा पहिला व्हिडिओ, सरकारला दिला 'असा' प्रस्ताव, भावनिक प्रतिक्रिया समोर

Pune Mechanical Parking Demolition: संभाजी उद्यानातील अडीच कोटींचे मेकॅनिकल पार्किंग जमीनदोस्त; महापालिकेचा लोखंडी सांगडा हटविण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे

Mahagaon Bribe Case : अंगणवाडी मदतनीस नियुक्तीसाठी लाचेची मागणी; महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT