smart cafe toilet sakal
विदर्भ

Wardha News : हिंगणघाटात राज्यातील पहिले ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’

नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

वर्धा - नावीन्यपूर्ण योजनेतून हिंगणघाट नगर परिषदेने ‘स्मार्ट कॅफे टॉयलेट’ची निर्मिती केली आहे. राज्यातील अशाप्रकारचा हा पहिलाच प्रयोग असून, केवळ १० लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या टॅायलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे. दुहेरी उद्देशाने आणि अतिशय सुंदरपणे बांधलेल्या या टॉयलेटचे सर्वत्र कौतुक होत आहे.

‘स्वच्छ आणि सुंदर शहर’ या संकल्पनेला अनुसरून राज्यात प्रथमच स्वच्छ, सुंदर आणि आकर्षक अशा स्मार्ट कॅफे टॉयलेटची निर्मिती नगर परिषदेद्वारे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नावीन्यपूर्ण योजनेतून यासाठी १० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. हिंगणघाट शहरातील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान येथील निसर्गरम्य परिसरात २०० स्केअर फूट इतक्या कमी जागेत हे टॉयलेट उभारण्यात आले आहे.

यामध्ये एक कॅफे, पुरुष व महिलांकरिता प्रत्येकी २ पाश्चात्त्य पद्धतीचे शौचालय, वॉश बेसिन तसेच महिलांकरिता सॅनिटरी वेंडिंग मशिन या प्रकारच्या सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. समोरील दर्शनीय भागात कॅफे देण्यात आलेला आहे. त्यामध्ये नागरिकांना स्वास्थवर्धक व आरोग्यदायी अंकुरित कडधान्य व ताज्या फळांचे ज्यूस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

या स्मार्ट कॅफेचे व्यवस्थापन बचत गटाच्या महिलांना देण्यात आले आहे. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. नागरिकांना टॉयलेटच्या टेरेसवर बसून ज्यूस पिण्याचा आनंद घेता येणार आहे. या स्मार्ट कॅफे टॉयलेटची दखल केंद्र व राज्य शासनाने घेतली आहे.

शासनाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमातून या उपक्रमाला प्रसिद्धी देण्यात आली आहे. स्मार्ट कॅफे टॉयलेटच्या निर्मितीसाठी नगर परिषदेचे प्रशासक हर्षल गायकवाड, नगर अभियंता जगदीश पटेल, कनिष्ठ अभियंता बाबा अली यांनी विशेष सहकार्य केले.

कमी खर्चात अधिक उपयुक्त उपक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. हिंगणघाट नगर परिषदेने अतिशय कमी खर्चात उत्तम असे दुहेरी उपयुक्त मॅाडेल तयार केले आहे. केंद्र आणि राज्य शासनानेदेखील या टॉयलेटची दखल घेतली आहे. येत्या काळात जिल्ह्यात ठिकठिकाणी असे टॉयलेट उभे राहतील, यासाठी प्रयत्न करू. यासाठी अन्य नगर परिषदांनीदेखील पुढाकार घेणे आवश्यक आहे.

- राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी, वर्धा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT