Murder 
विदर्भ

जादूटोणा केल्याचे भूत डोक्‍यात शिरले अन्‌ सांभोरा गावात घडले भयाण खुनी नाट्य... 

सकाळ वृत्तसेवा

चांदूरबाजार/बेलोरा (जि. अमरावती)  : तालुक्‍यातील सांभोरा गावात जादूटोण्याच्या संशयावरून पाच जणांनी मिळून बापलेकाचा खून केला. मंगळवारी (ता. सात) रात्री साडेसात ते आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. 

बिसन भिकाजी गजाम (वय 65) व सहदेव बिसन गजाम (वय 35, दोघेही रा. सांभोरा) अशी घटनेत मृत पावलेल्या पितापुत्राची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अमुल बच्छाव यांनी दिली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आठ ते दहा दिवसांपूर्वी यादव कुमरे याच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मुलाच्या आत्महत्येसाठी गजाम पितापुत्रांनी केलेला जादूटोणा कारणीभूत असल्याचा यादव कुमरे यांचा संशय होता. त्यामुळे त्यांनी दोघांनाही संपविण्याचा डाव आखला.

मंगळवारी (ता.7) रात्री गावातच घरापासून चारशे मीटर अंतरावर आधी मुलगा सहदेव गजाम याला महादेव सोमलाल कुमरे (वय 45), यादव सोमलाल कुमरे (वय 40), संजय महादेव कुमरे (वय 20), अजय महादेव कुमरे (वय 18) व अक्षय मंगलसिंग कुमरे (वय 20, सर्व रा. सांभोरा) या पाचही जणांनी घेरले. मारेकऱ्यांजवळ काठ्या, लोखंडी सळी व पाइप होते. त्यांनी सहदेववर सशस्त्र हल्ला करून त्याचा खून केला. त्यानंतर सर्व मारेकऱ्यांनी मृत सहदेवच्या घराकडे धाव घेतली. त्यावेळी घरात एकटे असलेले सहदेवचे वडील बिसन गजाम (वय 65) यांच्यावरही त्यांनी काठ्या, सळीसह पाइपने वार करून त्यांचाही घराच्या समोरच खून केला.

या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली. ब्राम्हणवाडा पोलिसांना घटनेची माहिती होताच ते घटनास्थळी दाखल झाले. घटनेनंतर काही तासात रात्रीतूनच पोलिसांनी महादेव कुमरे, यादव कुमरे, संजय कुमरे, अजय कुमरे व अक्षय कुमरे या पाचही मारेकऱ्यांना अटक करून बुधवारी (ता. आठ) त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

Rural Protest: स्मशानभूमीचा रस्ता नसल्याने ग्रामपंचायतीसमोरच सरण; दिगर ग्रामस्थांचा संताप, प्रशासनाचे लेखी आश्वासन

Marathi News Live Updates : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात

Animal Welfare: सणांतील डीजे-फटाक्यांचा दणदणाट; मुक्या प्राण्यांमध्ये भीती, तणाव आणि कानाच्या विकारांच्या केसेसमध्ये ३०-४० टक्के वाढ

SCROLL FOR NEXT