Four truck of illegal sand are seized 
विदर्भ

रेती घाटात नियंत्रक पथकाची धाड; अवैध रेतीचे चार ट्रक जप्त

राजेश सोळंकी

आर्वी - तालुक्यातील रेती घाट सध्या पूर्णपणे बंद असताना रेती तस्कर ट्रकने रेतीची चोरी करत असल्याची माहिती येथील तहसील कार्यालयास मिळताच अचानक तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार आनंद देवकर व पथकाने पिंपळगाव रेती घाटात धाड घालून अवैधरित्या रेती भरलेल्या 5 ट्रकवर कारवाई केली. मात्र, यातील एका ट्रक चालकाने कारवाई सुरू असताना ट्रक घेऊन पळ काढल्याची घटना शनिवारी (ता.28) घडली.

नियंत्रण विभागाने चार ट्रक जप्त करून पुलगाव पोलिस स्टेशनला ठेवले असून पळून गेलेल्या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील वर्धा नदी पात्रात पिंपळगाव रेती घाटात सकाळी अचानक खनिज तपासणी पथक प्रमुख नायब तहसीलदार देवकर पथकाने पाहणी केली असता वाहनात अवैधरित्या रेती भरत असलेले निदर्शनास आले त्यामुळे त्यावर पथकाने जप्तीची कारवाई सुरू केली.

ही कारवाई सुरू असताना एका वाहन चालकाला गाडीतून उतरण्याची सूचना केली. मात्र, मोबाईलवर बोलण्याचे निमित्त करून ट्रक मधील संपूर्ण रेती खाली करून व ट्रक चालू करून भरधाव वेगाने ट्रक पुलगावच्या दिशेने पळवून नेला. त्यामुळे, वाहन चालकावर गुन्हा दाखल केला आहे. तर, वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या निर्णयानंतर सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! मुंबई-पुण्यात सोनं किती रुपयांना?

Konkan Railway : CM फडणवीसांचं पत्र अन् राणेंचा दिल्लीत पाठपुरावा! सावंतवाडी टर्मिनसवर 'राजधानी'सह 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर, रेल्वेमंत्र्यांनी काय केली घोषणा?

Marathi News Live Updates: मंत्रालयासमोर झाडावर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन, सरसकट कर्जमाफीसह हमीभावाची मागणी

Chhatrapati Sambhajinagar: ज्ञानमंदिराच्या वाटेवर कडेवरच्या कसरती!; वरद विद्या मंदिरकडे जाणारा रस्ता खड्डे, चिखलाने माखल्याने पालक त्रस्त

IND vs ENG: भारताला ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीपूर्वी धक्का! प्रमुख फलंदाज संघातून बाहेर, बदली खेळाडूची BCCI कडून घोषणा

SCROLL FOR NEXT