Teacher Arrested esakal
विदर्भ

Gadchiroli Crime : पत्नीकडे कपडे शिवण्यासाठी येणाऱ्या महिलांचे चित्रीकरण करणारा शिक्षक अटकेत

पत्नीकडे कपडे शिवण्यासाठी घरी येणाऱ्या महिला कपडे बदलत असतानाचे चित्रीकरण करणाऱ्या एका शिक्षकास देसाईगंज पोलिसांनी अटक केली.

सकाळ वृत्तसेवा

पत्नीकडे कपडे शिवण्यासाठी घरी येणाऱ्या महिला कपडे बदलत असतानाचे चित्रीकरण करणाऱ्या एका शिक्षकास देसाईगंज पोलिसांनी अटक केली.

गडचिरोली - पत्नीकडे कपडे शिवण्यासाठी घरी येणाऱ्या महिला कपडे बदलत असतानाचे चित्रीकरण करणाऱ्या एका शिक्षकास देसाईगंज पोलिसांनी अटक केली आहे. नंदकिशोर भाऊराव धोटे (वय ४५), रा. देसाईगंज, असे अटकेतील आरोपीचे नाव असून, तो कुरखेडा तालुक्यातील एका जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहे.

प्राप्त माहितीनुसार नंदकिशोर धोटेची पत्नी घरी महिलांचे कपडे शिवण्याचे काम करते. त्यासाठी दररोज अनेक महिला धोटेच्या घरी येत असतात. शिवलेले कपडे योग्य आहेत की नाही, हे बघण्यासाठी धोटेच्या घरी एक छोटीशी खोली आहे. या खोलीत महिला कपडे बदलून पाहायच्या. हीच संधी साधून आरोपी धोटे एका छिद्रातून आपल्या मोबाईलमध्ये सगळे चित्रीकरण करायचा. ही बाब एका महिलेच्या लक्षात आली. तिने देसाईगंज पोलिसांत तक्रार करताच पोलिसांनी धोटेवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली.

सोमवार (ता. १५) कुरखेडा न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. धोटेकडून दोन मोबाईल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण रासकर यांनी दिली. दोन मोबाईलमध्ये खरेच त्याने चित्रीकरण केले काय किंवा केले असेल तर नेमके किती महिलांचे चित्रीकरण केले, याविषयीचा उलगडा तपासणीनंतरच होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill on IND vs SL Draw: "२५० षटकं अन् सलग तीन दिवस फिल्डिंग..." फॉलोऑननंतरही सामना ड्रॉ राहिल्याबद्दल गिल काय म्हणाला?

Marathi News Live Updates : नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 प्रवाशांचा पुढचा प्रवास सुरू

Manora News : कृषी केंद्राचा परवाना रद्द न करण्यासाठी २५ हजारांची लाच; मंडळ कृषी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Hotel Business : हॉटेल व्यवसायाला ग्राहकांच्या अविश्वासाचा फटका! एफडीए कारवाईनंतर शहरातील रेस्टॉरंटमध्ये २० टक्क्यांपर्यंत घट

Pune News : स्थायी समितीतील निर्णय फिरवला! टक्केवारीच्या ‘दुर्गंधी’ने स्वच्छ सेवक साहित्याविना

SCROLL FOR NEXT