The girl got married to her boyfriend under Pathrot police station 
विदर्भ

प्रेमासाठी युवतीने लावली अनोखी शक्कल; अपहरणाचा बनाव करून थाटला संसार

सकाळ डिजिटल टीम

अचलपूर (जि. अमरावती) : दर्यापूर तालुक्‍यातील एका गावातील २२ वर्षीय युवतीने आपले अपहरण करण्यात आल्याचा खोटा बनाव करून प्रियकरासोबत संसार थाटल्याची घटना समोर आली आहे.

सदर युवती आपल्या बहिणीकडे गेली होती. त्याचवेळी तिची ओळख अकोट तालुक्‍यातील एका युवकासोबत झाली. दोघांनीही पळून जाण्याचा निर्णय घेतला. इकडे नातेवाइकाने शेगाव पोलिस ठाण्यात युवती हरवल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर शेगाव व अकोट पोलिस पथक शोधकार्यात लागले. दुसरीकडे सदर युवतीने आपले अपहरण झाल्याचे व आपल्याला बांधून ठेवल्याचे फोटो घरच्या मंडळींना पाठविले.

दरम्यान, प्रियकराने त्याच्या वहिनीच्या मदतीने प्रेयसीसोबत लग्न केले व वाघडोह गावात आश्रय घेतला. बुलडाणा, अकोला, अमरावती जिल्ह्यातील संबंधित पोलिसांनी अखेर छडा लावत पथ्रोट पोलिसांच्या मदतीने प्रेमीयुगुलाला ताब्यात घेऊन शेगाव पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी शेगाव पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल साहेबराव सोनोने, जयंत बोचे, महिला पो.कॉ. रीना इंगळे, हेमांद्री घरडे, पथ्रोट पोलिस ठाण्याचे हे. कॉ. हेमंत येरखडे, पळसपगार, सुनंदा आदींनी ठाणेदार डंबाळे यांच्या मार्गदर्शनात तपास केला.

युवतीचे अपहरण झालेच नाही
हरविलेल्या युवतीचा शोध व तपास करून शेगाव येथील तपास पथकाकडे दोघांनाही सुपूर्द केले. युवतीचे अपहरण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. 
- नरेंद्र डंबाळे,
पोलिस निरीक्षक पथ्रोट

कायदेशीर विवाह करून दिले प्रमाणपत्र
आम्ही वधूचे समूपदेशन करतो. कुणाचा दबाव आहे काय, याची विचारणा केली असता कुठलेही दडपण नसल्याचे वधूने प्रतिज्ञापत्र भरले. त्यानुसार कायदेशीर विवाह करून विवाह प्रमाणपत्र दिले. लग्न लावण्यापूर्वी चौकशी केली असता अपहरण झाल्याचे जाणवले नाही. 
- शरद कोसरे 
प्रधान आर्य समाज मंदिर, पथ्रोट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Khan Sir Firing Case: गोळीबारप्रकरणी खान सरांनाच अटक होण्याची शक्यता; दोन्ही अंगरक्षकांनी गोळीबाराची दिली कबुली

Vaibhav Sooryavanshi: Dhoni आणि 'गँग्स ऑफ वासेपूर'नंतर आता Vaibhav सूर्यवंशी ऋद्धिमा पाठकचा खळबळजनक खुलासा, Video Viral

Iran Crisis: मोजतबा खामेनींना सत्तापालटाची भीती! इराणमध्ये कठोर नियम लागू; अमेरिका-इस्त्रायलवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा

IND vs AFG: टीम इंडियाला सर्वात मोठा धक्का! विराट कोहली मालिकेबाहेर? 'हा' खेळाडू घेणार जागा!

SCROLL FOR NEXT