Electric shock esakal
विदर्भ

Electric Shock : विजेच्या धक्क्याने विद्यार्थिनीचा मृत्यू; मुख्याध्यापक निलंबित

पुयार येथे जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज शाळा सुरू होण्यापूर्वी लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेलेल्या सहा वर्षीय विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला.

सकाळ वृत्तसेवा

लाखांदूर - पुयार येथे जि. प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत आज शाळा सुरू होण्यापूर्वी लघुशंकेसाठी स्वच्छतागृहात गेलेल्या सहा वर्षीय विद्यार्थिनीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. यशस्वी सोपान राऊत असे मृत चिमुकलीचे नाव असून, नॅपकिन जाळण्याच्या मशीनच्या वायरमुळे ही घटना घडली असल्याचा संशय लाखांदूर पोलिसांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.

यशस्वीने पुयार येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या पहिल्या वर्गात यंदाच प्रवेश घेतला होता. यशस्वी सकाळी दहा वाजता शाळेत आली. वर्ग सुरू होण्यास वेळ असल्याने शाळेच्या आवारात मुले-मुली खेळत होते. या दरम्यान यशस्वी स्वच्छतागृहात गेली. तिथे तिचा ॲल्युमिनियमच्या तारेला स्पर्श झाला. त्यात विद्युत प्रवाह आल्याने तिला जोरदार झटका लागून ती बेशुद्ध होऊन खाली पडली. याची इतर मुलींना माहिती झाल्यावर त्यांनी स्वच्छतागृहात जाऊन आधी तिला बाजूला केले. नंतर स्वयंपाक करणाऱ्या महिलांना याबाबत माहिती दिली.

काही वेळाने मुख्याध्यापक भावे घटनास्थळी आले. त्यानंतर जखमी यशस्वीला उपचारासाठी लाखांदूर येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

तेथे डॉ. दत्तात्रय ठाकरे यांनी यशस्वीला तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती लाखांदूर पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार सचिन पवार, पोलिस उपनिरीक्षक दिनकर आगाशे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. शाळेतील स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन जाळण्यासाठी मशीन लावली आहे. या मशीनला लावलेली अल्युमिनियमची तार लोंबकळत होत्या. त्यालाच मृत यशस्वीचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसला असावा, असा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

संतप्त गावकऱ्यांचे आंदोलन

या घटनेनंतर शाळा प्रशासनावर कडक कारवाई करावी, या मागणीसाठी संतप्त गावकऱ्यांनी यशस्वीचा मृतदेह घेऊन लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयासमोर धरणे आंदोलन केले. यात परिसरातील राजकीय पदाधिकारी सहभागी झाले. सायंकाळी पाच वाजता मृत यशस्वीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याचे, मुख्याध्यापकांचे निलंबन व त्यांच्यावर गुन्हा दाखल, तसेच इतर मागण्यांबाबत आश्‍वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT