Rain esakal
विदर्भ

Rain : बळीराजासाठी आनंदवार्ता! ‘ला निना’मुळे यंदा विदर्भात भरपूर पाऊस

भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला असून, विदर्भातही मॉन्सून दणक्यात बरसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नागपूर - भारतीय हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पावसाचा अंदाज वर्तविला असून, विदर्भातही मॉन्सून दणक्यात बरसणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसा अंदाज हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे वैदर्भी शेतकऱ्यांसाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे.

भारतीय हवामान विभागाने नुकताच नैऋत्य मोसमी पावसाचा (मॉन्सून) पहिला दीर्घकालीन अंदाज वर्तविला आहे. त्यानुसार, देशभर सरासरीच्या १०६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. विदर्भातही यंदा मॉन्सून मेहरबान राहणार आहे. यासंदर्भात प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ प्रा. सुरेश चोपणे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, मुळात मॉन्सूनचा पाऊस जागतिक पातळीवरील ‘एल निनो’ किंवा ‘ला निना’ या दोन गोष्टींवर अवलंबून असतो.

‘एल निनो’च्या प्रभावामुळे कमी व अनियमित पाऊस, तर ‘ला निना’ मुळे सर्वत्र दमदार पाऊस पडतो. सुदैवाने यावर्षी ‘ला निना’चा प्रभाव असणार आहे. ही स्थिती दमदार पावसासाठी अनुकूल मानली जाते. त्यामुळे यंदा जून ते सप्टेंबरदरम्यान विदर्भात भरपूर पाऊस बरसणार आहे. उल्लेखनीय म्हणजे, प्रादेशिक हवामान विभागानेही सरासरी पावसाचे भाकीत वर्तविले आहे. विदर्भात साधारणपणे ९३७ मिलिमीटर पाऊस पडतो. अनुकूल परिस्थितीमुळे यंदा पावसाचे प्रमाण अधिक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वारे जेवढे मजबूत, तेवढा अधिक पाऊस

यावर्षी पॅसिफिक महासागरात ‘ला निना’ची स्थिती राहणार आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरूच्या समुद्र किनाऱ्यावर तापमान जितके कमी, तितका मॉन्सून अधिक मजबूत असतो. यावर्षी त्या ठिकाणी तापमान सरासरीच्या कमी राहण्याची शक्यता असल्याने, साहजिकच त्याचा मॉन्सूनवर सकारात्मक परिणाम होणार आहे.

याउलट पॅसिफिकमधील तापमान अधिक राहिल्यास ‘एल निनो’ ची स्थिती उद्भवून त्याचा मॉन्सूनवर विपरित परिणाम होतो. मॉन्सून ही एकप्रकारे हवाच असते. वारे जेवढे मजबूत राहतील, तेवढा अधिक पाऊस पडतो. त्यात अडथळे येत राहिल्यास मॉन्सून कमकुवत बनून, पावसावर विपरित परिणाम होतो.

अवकाळीचा मॉन्सूनवर परिणाम नाही

प्रा. चोपणे यांनी विदर्भातील सध्याच्या अवकाळी पावसाचा आगामी मॉन्सूनवर विपरित परिणाम होणार नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, साधारणपणे कडक उन्हाळ्यावर पाऊस अवलंबून असतो. एप्रिलमध्ये पाऊस व ढगाळ वातावरण असले तरी, अजूनही मे महिना शिल्लक आहे. मे मध्ये किमान पंधरा दिवस उन्हाची लाट राहिली तरीदेखील पुरेसे आहे. उल्लेखनीय म्हणजे, पुढील महिन्यात सूर्य आग ओकण्याची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.

‘एल निनो’ व 'ला निना'मधील फरक

स्पॅनिश भाषेत ‘एल निनो’ म्हणजे लहान मुलगा (द लिटिल बॉय) आणि ‘ला निना’ म्हणजे लहान मुलगी (द लिटिल गर्ल). ते भाऊ आणि बहिणीसारखे आहेत. या भावंडांप्रमाणे, दोन हवामानपद्धती एक दुसऱ्याच्या विरुद्ध आहेत.‘ला निना’मुळे पॅसिफिकमधील पाणी नेहमीपेक्षा थंड होते. त्याच प्रदेशात ‘एल निनो’मुळे पाणी जास्त गरम होते. ज्यावेळी ‘ला निना’चा प्रभाव असतो, त्यावर्षी भरपूर पाऊस पडतो. याउलट ‘एल निनो’ वर्षात दुष्काळसदृश स्थिती असते. साधारणपणे ‘ला निना’ वर्ष ‘एल निनो’नंतर एक किंवा दोन वर्षांनी येते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Surya Kant : ‘कोर्टाची दारे सर्वांसाठी खुली’: इंडिया आघाडीच्या नेत्यांना भेटीस नकार देत सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे स्पष्टीकरण

Gold Price Today: दसऱ्याआधी सोन्याचे भाव घसरले! ग्राहकांना मोठा दिलासा; आजचे 22, 24 कॅरेटचे दर पाहा

मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Nagpur News: तिसरा रिंगरोड ठरणार प्रगतीचा महाकॉरिडॉर!; १०७ गावांतून जाणार १४९ किमी मार्ग; रस्ता, मेट्रो अन् टाऊनशिपचे नियोजन

Kolhapur Gokul Election Latest News : 'काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांवर दगड मारू नयेत'; मुख्‍यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या सतेज पाटलांना चंद्रकांतदादांचा इशारा

SCROLL FOR NEXT