co-operative sector 
विदर्भ

सहकार क्षेत्रासाठी आनंदवार्ता; दिवाळीपूर्वीच मिळणार सदस्यांना लाभांश 

विनायक रेकलवार

मूल (जि. चंद्रपूर) : कोरोना महामारीमुळे यावर्षी वार्षिक आमसभा न झाल्याने सहकारी संस्थांचे सदस्य लाभांशापासून वंचित होते. पण सरकारने विशेष बाब म्हणून लाभांश वाटपाचे अधिकार संस्थांच्या संचालक मंडळास दिले. त्या संबंधाने सहकार कायदा दुरुस्तीचा अध्यादेश राज्यपालांनी नुकताच जारी केला. त्यामुळे दिवाळीपूर्वी या क्षेत्राशी संबंधित लोकांना त्याचा लाभ मिळणार आहे. 

राज्यात दोन लाख अठरा हजारांहून अधिक सहकारी संस्था आहे. राज्याची अर्धी लोकसंख्या त्यावर विसंबून आहे. शेती, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, कृषी पणन, साखर कारखाने, विविध कार्यकारी संस्था, आदिवासी संस्था, सूतगिरण्या, पतपुरवठा संस्था, बॅंकिंग, गृहनिर्माण, मजूर व पगारदारांच्या पतसंस्था अशा सर्वच संस्थांना आता आमसभेपूर्वी काही निर्णय घेण्याचे अधिकार या अध्यादेशामुळे संचालक मंडळाला मिळाले.

त्यांना लाभांश वाटपासह इतर महत्त्वाचे निर्णय घेणे सोयीचे होणार आहे. यात शिल्लक रकमेच्या विनियोगाचे अधिकार, पुढीलवर्षीच्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे, लेखापरीक्षक नेमणे इत्यादी अधिकार संचालक मंडळास दिलेले आहेत. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केलेल्या मागणीला सरकारने न्याय दिल्याने संघटनेचे जी. जी. धोटे, संतोष कुंटावार, धनंजय बन्सोड, सुभाष बेरड, विठ्ठल आवारी, अरुण बावणे, विद्याचरण गोल्लर, मारुती जिल्हेवार, लक्ष्मण सोयाम, चंदन बिलवणे, सुरेश जिल्हेवार, अशोक टिपले, भक्तदास कांबळे यांनी शासनाचे आभार मानले आहे. 

राज्य शासनाच्या या निर्णयामुळे सहकार क्षेत्रात आनंद आहे. शेतकरी, मजूर, कामगार, नोकरदार अशा सर्व लोकांना ऐन दिवाळीत लाभ मिळणार आहे. शिवाय इतर सुधारणांमुळे संस्थांचे अडलले निर्णय मार्गी लागतील. आम्ही शासनाला केलेल्या पत्रव्यवहारानंतर सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी आम्हाला दिलेला शब्द पाळला आहे. या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. 
- किशोर उरकुंडवार, 
संचालक, प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था सावली. 

संपादन ः राजेंद्र मारोटकर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Earthquake: नाशिकमध्ये हरसूल परिसरात २४ तासांत चार सौम्य भूकंप, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

Nagpur Youth Case : 'बाबा, मी पुलावरून उडी घेतोय...'; वडिलांना फोन केला अन्..., आत्महत्येपूर्वीचा थरार CCTV मध्ये कैद, 25 वर्षीय प्रज्वलनं का उचललं टोकाचं पाऊल?

Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिकेत घरफाळा, पाणीपट्टी वाढ होणार, प्रशासनाने सादर केला प्रस्ताव; नगरसेवकांचा थेट विरोध

RBI Assistant Job 2026: RBI असिस्टंट पदासाठी किती मिळतो इन-हँड पगार? जाणून घ्या फायदे आणि निवड प्रक्रिया

T20 World Cup: भारतही नको अन् पाकिस्तानही नकोच! 'या' अटी पूर्ण झाल्या तर सेमीफायनलमध्ये श्रीलंकेला 'होम ॲडव्हांटेज'

SCROLL FOR NEXT