health department appointing district Health Officer Melghat not have head doctors and staff  sakal
विदर्भ

Achalpur News : कोणी अधिकारी देता का अधिकारी ?

आरोग्य विभागाला मिळेना कारभारी : मेळघाटही प्रभारींच्या भरवशावर

राज इंगळे

अचलपूर : मागील काही महिन्यांपासून जिल्हा आरोग्य विभागाचा कारभार प्रभारींच्या भरवशावर सुरू आहे. त्यामुळे आरोग्य विभागाचा डोलारा कोलमडला आहे. आरोग्य विभागाला मुखीया नसल्याने डॉक्टर, कर्मचारी सुद्धा मनमानी कारभार करीत असल्याची ओरड आहे. शासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे.

आरोग्यमंत्र्यांना मेळघाटची परिस्थिती माहीत असूनसुद्धा जिल्हा आरोग्य अधिकारी तथा मेळघाट अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी यांची नेमणूक करण्यासाठी इतका विलंब का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. तर कोणी अधिकारी देता का अधिकारी? म्हणण्याची वेळ जिल्हा वासियांवर आली आहे.

पावसाने दडी मारल्याने उकाडा वाढला आहे. त्यामुळे विषाणूजन्य व कीटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. अशा स्थितीत नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असणाऱ्या आरोग्य विभागाचा डोलारा कोलमडला आहे.

जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी, मेळघाटातील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, चिखलदरा तालुका वैद्यकीय अधिकारी, जिल्हा हिवताप अधिकारी, जिल्हा हत्तीरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग अधिकारी ही महत्त्वाची पदे रिक्त आहेत.

कार्यरत वैद्यकीय अधिकाऱ्यांवर प्रभारी पदाचा अतिरिक्त भार सोपविला आहे. यातील अनेक पदे काही वर्षांपासून रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे स्थानांतरण झाले.

मेळघाटच्या दृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे पद महत्त्वाचे आहे. ही दोन्ही पदे मागील काही महिन्यांपासून प्रभारींच्या भरवशावर सुरू आहेत. तर हिवताप व हत्तीरोग विभाग एकाच दावणीला बांधण्यात आले आहे.

जिल्हा हिवताप अधिकारी हे पद कित्येक महिन्यांपासून रिक्त आहे. अतिरिक्त प्रभारावरच काम सुरू आहे. सध्या साथीच्या आजारांचे थैमान सुरू आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयासह शासकीय रुग्णालये फुल्ल झाली असल्याचे चित्र दिसून येत आहे.

जिल्ह्यात काही दिवसांपासून डोळ्यांचा आजार, थंडी, खोकला अशा आजारांचे रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत. वातावरण बदलामुळे तसेच व्हायरलमुळे रुग्णांना टायफॉईड, मलेरिया, डेंगी अशा आजारांची साथ सुरू आहे. जिल्ह्यातील नागरिकांवर कोणी अधिकारी देता का अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Accident: कोल्हापुरात भीषण अपघात! एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू

Hero HF Deluxe : पेट्रोलची चिंता संपणार? नितीन गडकरींची मोठी भेट; भारतात पहिल्या Flex Fuel बाईकची एन्ट्री, किंमत 72 हजारपासून सुरू

Pali News : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला कॉलर पकडून जिवे मारण्याची धमकी; शासकीय कामात अडथळा आणणाऱ्या पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल

अफगाणिस्तान कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का! स्टार खेळाडूकडून निवृत्तीचा धक्कादायक निर्णय; WTC फायनलचाही होता हिस्सा

Ghansangavi Crime : भुतेगाव येथे दूधना नदीपात्रात पोलिसांची कारवाई; आठ टिप्पर तीन जीसीबी जप्त, अकरा जणाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT