Gajya Handi sakal
विदर्भ

Hinganghat Crime : कुख्यात गुंड गज्या हंडीचा खून; चार जणांना अटक

कुख्यात गुंड गजानन खंगार ऊर्फ गज्या हंडी याचा जुन्या वैमनस्यातून शस्त्राने वार करून खून करण्यात आला.

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट - कुख्यात गुंड गजानन खंगार ऊर्फ गज्या हंडी याचा जुन्या वैमनस्यातून शस्त्राने वार करून खून करण्यात आला. शास्त्री वॉर्डातील किसान जिनिंगसमोरील गंगामाता मंदिर मार्गावर शनिवारी (ता. ४) रात्री ७.३० ते ८ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली.

गज्या हंडी हा कुख्यात गुंड म्हणून ओळखला जायचा. तो गावठी दारूचा व्यवसाय करीत होता. शास्त्री वॉर्ड झोपडपट्टी परिसरात त्याची दहशत होती. या खुनातील संशयित आरोपी म्हणून सचिन क्षत्रीय, बंटी खडसे, मयूर कोराम या तिघांना शनिवारी (ता. ४) रात्री ताब्यात घेण्यात आले. मुख्य आरोपी प्रशांत ऊर्फ गोलू राऊत हा फरार झाला.

रात्री त्याला तळेगाव भारी, यवतमाळ येथून गुन्हे अन्वेषण विभागाचे उपनिरीक्षक राम खोत, रामकिशन इप्पर, सचिन इंगोले यांनी ताब्यात घेऊन हिंगणघाट पोलिस ठाण्यात आणले. या खुनाबाबत माहिती मिळताच ठाणेदार मारोती मुळीक पोलिसांसह घटनास्थळी दाखल झाले.

मृत गजानन उर्फ गज्या हंडी याचा जागीच मृत्यू झाल्याने त्याचा मृतदेह पोलिस गाडीनेच सामान्य उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांनी रविवारी दुपारी परििस्थतीची पाहणी करीत मार्गदर्शन केले. या परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरीता पोलिस तैनात करण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आक्रमक?; देशातील सर्व मत्र्यांचे मागवले वर्क बुक; उद्याच्या बैठकीत होणार झाडाझडती

Dial 112 False Alert : दारूच्या नशेत ‘डायल ११२’ वर खोटी माहिती; पोलिस पोहोचले अन् सापडली अवैध दारू, लोहारा पोलिसांत गुन्हा

Pakistan Cricket : भारताला २०२१ मध्ये पराभूत केले अन् पनवती लागली! पाकिस्तान क्रिकेटच्या 'अधोगती'मागचा अजब तर्क

Marathi News Live Updates : अंतरवाली सराटीत OBC उपोषणासाठी स्टेजला पोलिसांचा नकार

Homemade Anti-Aging Creams: ५०व्या वर्षीही चेहरा दिसेल तरुण! सुरकुत्या आणि बारीक रेषांसाठी घरीच बनवा ‘या’ ८ देसी क्रीम

SCROLL FOR NEXT