file photo 
विदर्भ

काय सांगता? मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथील ‘ती’ ऐतिहासिक जत्रा अखेर रद्द...हे आहे कारण

प्रदीप बहुरूपी

वरुड (जि. अमरावती)  : कोरोना विषाणू महामारीचा वाढता संसर्ग लक्षात घेता मध्य प्रदेशाच्या पांढुर्णा येथील ऐतिहासिक गोटमार यात्रा यावर्षी रद्द करण्यात आल्याची माहिती छिंदवाडाचे जिल्हाधिकारी सौरभकुमार सुमन यांनी पांढुर्णा नगर परिषद सभागृहात आयोजित शांतता समिती व गोटमार जत्रा समितीच्या बैठकीदरम्यान नुकतीच दिली.

या वेळी शांतता समिती तसेच गोटमार जत्रा समितीच्या सदस्यांनी आपापले विचार बैठकीत मांडले. बुधवारी (ता. १९) पोळ्याच्या पाडव्याला होणारी गोटमार जत्रा खेळली जाणार नाही, असा निर्णय एकमताने बैठकीत घेण्यात आला. इतकेच नव्हे तर पूजाअर्चनासुद्धा पाच लोकांच्या उपस्थितीतच होणार असल्याचे सांगितले गेले. या वेळी मध्य प्रदेशासह महाराष्ट्रातून गोटमार बघायला येणाऱ्यांना माहिती मिळावी म्हणून एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे कळविण्यात यावे, अशी सूचनादेखील या वेळी जिल्हाधिकारी यांनी केली.

झेंडा जाम नदीच्या काठावरच ठेवावा

विश्‍वप्रसिद्ध गोटमार जत्रेच्या दिवशी दरवर्षी सावरगाव येथील कावले कुटुंबीयांच्या हस्ते या झेंड्याची पूजा करून जाम नदीच्या मध्यभागी लावण्यात येत होते. मात्र यावर्षी कोरोना संसर्ग थांबविण्याच्या दृष्टिकोनातून नागरिकांच्या भावनांचा विचार करता तो झेंडा जाम नदीच्या काठावरच ठेवण्यात येईल.

जनता कर्फ्यू लागणार

ज्यांना त्या झेंड्याची पूजा करायची असेल, त्यांनी सकाळी येऊन पूजा करून घ्यावी. नंतर एक वाजता तो झेंडा मॉं चंडी मंदिरात ठेवून देण्यात येईल. त्यानंतर जनता कर्फ्यू लागू करण्यात येईल. याकरिता पोलिस बंदोबस्तसुद्धा लावण्यात येणार आहे. अशाप्रकारे पांढुर्णा येथील गोटमार रद्द करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.


नागरिकांना पांढुर्ण्यात प्रवेश नाही

या दिवशी महाराष्ट्रातील नागरिकांना पांढुर्णा शहरात प्रवेशदेखील करता येणार नसल्याची माहिती जिल्हाधिकारी सौरभकुमार सुमन यांनी दिली. बैठकीला जिल्हा पोलिस अधीक्षक विवेक अग्रवाल, उपविभागीय अधिकारी मेघा शर्मा, तहसीलदार मनोज चौरसिया, ठाणेदार राजेशसिंह चौव्हान, नगराध्यक्ष प्रवीण पालिवाल, मुख्याधिकारी राजकुमार इवनाती यांच्यासह सर्वच विभागांतील अधिकारी, शांतता समिती व गोटमार जत्रा समितीचे सदस्य उपस्थित होते.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT