Farmers put banner sakal
विदर्भ

आमदारांना घर : शेतकऱ्यांनी बॅनर लावून मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत हक्काचे ३०० घरे बांधून देण्याची घोषणा

अभय भुते

जेवनाळा : नुकत्याच मुंबई येथे पार पडलेल्या आर्थिक अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी आमदारांना मुंबईत हक्काचे घर बांधून देण्याची घोषणा केली. यावर सोशल मीडियावर अनेकांनी खोचक टीका ही केल्या मात्र जेवनाळा येथील युवा शेतकऱ्यांनी या बद्दलचे आभार माणनारे बॅनर लावत थेट मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्याने गाव चर्चेत येत आहे.

मागील आठवड्यात राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय आमदारांना मुंबईत हक्काचे ३०० घरे बांधून देण्याची घोषणा केली. यावर संतप्त शेतकऱ्यासह नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रोष वेक्त केला तर लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील तरुण शेतकऱ्यांनी "गरीब व गरजू आमदारांना हक्काचे घर मिळवून दिल्याबद्दल मुख्यमंत्री साहेबांचे आभार’’ असे चक्क बॅनर लावून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

शासनाकडून एखादी घोषणा झाली की सत्ताधाऱ्यांकडून मोठे मोठे फलक लावत स्वतःची वाहवाही केली जाते मात्र आता आमदारांना घरे दिल्यावर याची पाहिजे तेवढी प्रसिद्धी केली जात नसल्याने जनसामान्यांना सरकारने घेतलेले निर्णय माहिती व्हावी या उद्देशाने बॅनर लावत असल्याचे तरुणांनी सांगितले.

हक्काचे घर झाले, आता अंतोदय राशन कार्ड द्या

ग्रामीण भागातील अनेक नागरिक हे घरकुलाच्या प्रतीक्षेत असताना शाशन आपल्या आमदारांना घरे बांधून देत आहे. मग या गरीब आमदारांना निवाऱ्याची व्यवस्था तर झाली आता अंतोदय राशन कार्ड देऊन अन्नाची व्यवस्था करून दिल्यास यांचे जीवनमान उंचावण्यासाठी महत्वाचे ठरेल.

राज्य सरकारला शेतकऱ्यांपेक्षा आपल्या आमदारांची जास्त चिंता असल्याचे दिसत आहे. ग्रामीण भागातील नागरिक उघड्यावर संसार थाटात असून राज्य सरकार आमदारांना घरे देत आहे.हीच बाब सर्वसान्याना माहिती व्हावी या उद्देशाने फलक लावून मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.

- दीनदयाल गिरहेपुंजे, युवक जेवनाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT