लाखनी : शिवणी शेतशिवारात मृतावस्थेत पडलेले हरिण.  
विदर्भ

धक्कादायक! शिवणी शेतशिवारात विजेच्या प्रवाहाने केली हरणाची शिकार; शिकाऱ्यांचा शोध सुरू

शैलेश उरकुडे

लाखनी (जि. भंडारा) : तालुक्‍यातील शिवणी (मोगरा) शिवारात विजेच्या प्रवाहाने हरणाची शिकार केल्याची घटना शुक्रवारी (ता. १८) पहाटे उघडकीस आली. यामुळे वनविभागात खळबळ उडाली आहे. वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनेवरून वनविभागाची चमू घटनास्थळी दाखल झाली असून शिकार करणाऱ्या आरोपींचा शोध सुरू आहे.

शिवणी शिवारात वीज वितरण कंपनीचे ३३ केव्ही आणि ११ केव्हीचे उपकेंद्रे आहेत. या उच्च दाबाच्या वीज वाहिनीवर संशयित शिकाऱ्यांनी तारेचा आकडा टाकल्याने वीजपुरवठा बंद झाला होता. त्यामुळे बिघाडाचा शोध घेण्यासाठी लाइनमन खडसे, सतीश उके, श्री. ठाकरे हे गस्तीवर निघाले.

त्यांना धर्मराज राइस मिलच्या मागे शेतात उच्च दाबाच्या वाहिनीच्या तारांवर तारेचा आकडा टाकून २०० ते ३०० फूट लांब खुट्या ठोकून तार लांबविल्याचे दिसून आले. याच तारेचा स्पर्श झाल्याने एक मृत हरिणही दिसून आले. त्यामुळे शिकाऱ्यांनी हरणाच्या शिकारीसाठी विद्युत तारेमध्ये वीज प्रवाह सोडल्याचे स्पष्ट झाले.

शिकाऱ्यांचा शोध सुरू

वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत वनविभागाला घटनेची माहिती दिली. लाखनीचे वनक्षेत्रसहायक राऊत वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. मृत हरणाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पोहरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चोपकर यांना पाचारण करण्यात आले. वनविभागाची चमू शिकाऱ्याचा शोध घेत आहे.


वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका

लाखनी वनपरिक्षेत्रात हरिण, रानडुक्कर, ससा यांसारख्या तृणभक्षक प्राण्यांच्या शिकारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या घटनांवर अंकुश लावण्याची मागणी होत असून शिकाऱ्यांना पकडण्याची मोहीम तीव्र करण्यात आली आहे. ग्रामीण भागात वन्यप्राणी पाण्याच्या शोधासाठी गावाच्या शिवारात येत आहेत. नेमके याच संधीचा फायदा शिकारी घेत आहेत.
 

(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT