Chandrapur Government Medical College 
विदर्भ

Chandrapur : उपचार शासकीय, औषधोपचार खासगी; चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकार

साईनाथ सोनटक्के :

चंद्रपूर : शासकीय रुग्णालयांत उपचारासोबत औषधोपचारसुद्धा केला जातो. त्यामुळे गोरगरीब रुग्णांसाठी शासकीय रुग्णालये ही उपचार घेण्याचे हक्काचे ठिकाण बनली आहेत. परंतु, चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यासर्व प्रकाराला अपवाद ठरले आहे.

मागील काही दिवसांपासून येथे येणाऱ्या रुग्णांवर वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार केला जातो. परंतु, औषधांचा साठा नसल्याने रुग्णांना खासगीतून खरेदी करावा लागत आहे. यात गरिब रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे. परंतु, याकडे अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींचे लक्ष नसल्याने त्याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या मोठी आहे.

तसेच उद्योगांमुळे वाहतूकसुद्धा वाढली आहे. त्यामुळे जिल्ह्यात अपघात असो वा अन्य घटना या नित्याच्याच झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिक चंद्रपूर या जिल्हास्थानी असलेल्या सामान्य रुग्णालयांत उपचारासाठी हक्काने येत होते.

यासोबतच लगतच्या गडचिरोली जिल्हा आणि तेलंगणा, आंध्रप्रदेशातील रुग्णसुद्धा मोठ्या संख्येने उपचारासाठी येत होते. त्यामुळे येथील बाह्य आणि आंतर रुग्णांची संख्या लक्षात घेता चंद्रपूर सामान्य रुग्णालयाला वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी समोर आली.

राज्य शासनाने अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर चंद्रपूरला वैद्यकीय महाविद्यालयाचा दर्जा दिला. यानंतर रुग्णालयातील आरोग्यसेवेचा दर्जा वाढणार, वैद्यकीय अधिकाऱ्यांची अधिकची पदे भरली जाणार, अत्यावश्यक सेवा उपलब्ध होणार, उपचारासोबतच औषधोपचारही मिळणार, असे येथील नागरिकांना वाटू लागले. काही काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त होती.

मात्र, आता बऱ्यापैकी वैद्यकीय अधिकारी येथे सेवा देत आहेत. परंतु, मागील काही महिन्यांपासून रुग्णालयात औषधसाठा उपलब्ध नाही. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांनासुद्धा उपचार करताना अडचणी येत आहेत. तर, खासगीतून औषधसाठा खरेदी करावा लागत असल्याने गोरगरिब रुग्णांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: 11 हजारांनी घसरल्यानंतर सोन्याने घेतला U-Turn! ग्राहकांना मोठा झटका? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Anna Hazare Praises Tukaram Mundhe : "अशा डॅशिंग अधिकाऱ्यांची देशाला गरज"; तुकाराम मुंढेंच्या 'त्या' धडक मोहिमेवर अण्णा हजारे खूश, केलं तोंडभरुन कौतुक

Latest Marathi News Live Update : व्हेनेझुएलामधील भीषण भूकंपानंतर भारताकडून 'ऑपरेशन अमिस्टाड' अंतर्गत तातडीची मदत

सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

TrashBot : बारावीच्या विद्यार्थिनीने बनवला अद्भुत 'ट्रॅशबॉट' रोबो; कचरा बघताच पळत जाऊन करतोय साफसफाई, पाहून तुमचं डोकं चक्रावेल

SCROLL FOR NEXT