Crime sakal
विदर्भ

MD Drug Powder : एमडी ड्रग पावडर विक्री करणारा गजाआड

मेफेड्रोन ड्रग पावडर विकणाऱ्या आरोपीला डिबी स्कॉड पथकाने गजाआड केले.

सकाळ वृत्तसेवा

मेफेड्रोन ड्रग पावडर विकणाऱ्या आरोपीला डिबी स्कॉड पथकाने गजाआड केले.

खापरखेडा - नांदा (कोराडी) परिसरात मेफेड्रोन ड्रग पावडर विकणाऱ्या आरोपीला डिबी स्कॉड पथकाने गजाआड केले. या घटनेतील आरोपींकडून १ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार आशीष सागर रामटेके(वय३३, सन्याल नगर, नारी रोड, टेका नाका, नागपूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नांदा पुलाजवळ एमडी ड्रग्स पावडर नावाचा अंमली पदार्थ घेऊन विक्रीकरीता येणार असल्याची खात्रीशिर माहिती एका खबऱ्याद्वारे खापरखेडा डिबी स्कॉडच्या पोलिसांना मिळाली. डिबी स्कॉड पोलिसांनी मिळालेली गुप्त माहिती वरिष्ठांना दिली. वरिष्ठांचा आदेशानुसार मिळालेल्या खबरीतील वर्णनास मिळते जुळते वर्णन असलेली व्यक्ती काळया रंगाची दुचाकीने नांदा पुलाजवळील दादाजी धुनिवाले महाराज मंदिरासमोर येऊन थांबल्याने आरोपीचा घेराव करण्यात आला. लागलीच त्याला ताब्यात घेऊन त्याचे नाव-गाव विचारण्यात आले.

आरोपीने आपले नाव आशीष सागर रामटेके असे पोलिसांना सांगितले. यावरून पोलिसांनी पंचा समक्ष ताब्यात घेतलेल्या आरोपीची अंगझडती घेतली असता त्याने घातलेल्या जिन्स पॅन्टच्या डाव्या खिश्यात एक प्लास्टिकची प्रेसलॉक पन्नीमधे पांढऱ्या रंगाची पावडर दिसून आली. नमूद आरोपीच्या ताब्यातून ८ ग्रॅम१०मिली ग्रॅम मेफेड्रोन ड्रग पावडर (किंमत८१ हजार रूपये) व एक मोबाईल हॅन्डसेट (किंमत दहा हजार रूपये), दुचाकी, असा एकूण एक लाख४१ हजार रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

ही कामगीरी पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण नागपूर विशाल आनंद, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ.संदिप पखाले, सहाय्यक पोलिस अधीक्षक आशित कांबळे, तथा उपविभागीय पोलिस अधिकारी रामटेक तथा अति. कार्यभार कामठी विभाग, खापरखेडा पोलीस निरीक्षक प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात डी.बी पथकचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक कांक्रेडवार, पो.ह.उमेश ठाकरे, आशिष भुरे, दिलीप पटले, शैलेश यादव, पो.ना. प्रमोद भोयर, राजु भोयर, मुकेश वाघाडे यांनी पार पाडली.

कुठून येते हे `एमडी’ पावडर?

नागपूर पोलिसांकडून काही दिवसापूर्वीच ड्रग्ज प्रकरणी काही तरुणांना ताब्यात घेतले होते. नागपूर जिल्ह्यात ड्रग्ज येते कुठून असा सवाल जनसामान्यांमधून केला जात आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर शहरात अभियांत्रिकीचा विद्यार्थी ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने नागपूरसह परिसरात खळबळ उडाली होती. ग्रामीण भागात एमडी पावडर येते कुठून, त्याची विक्री कशी आणि कोणामार्फत होते, हे तपासात उघड करणे खापरखेडा पोलिसांसमोर आव्हानच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crude Oil Crisis: इंधन दरवाढीविरोधात उद्या राज्यभर आंदोलन! तुमच्या शहरात पेट्रोलचे भाव किती?

Raigad Fuel Hike: रायगडमध्ये डिझेल-पेट्रोल दरवाढ; ट्रॅक्टर-जेसीबी भाडे २०-२५ टक्क्यांनी वाढले, बळीराजा महागाईने होरपळला

Maratha Vadhu-Var Melava: जगदंब फाउंडेशनचा १०९ वा मोफत मराठा वधू-वर मेळावा उत्साहात; डॉ. नानजीभाई ठक्कर यांचे सर्व समाजासाठी मेळावे घेण्याचे आश्वासन

Railway Crime : पनवेल–नांदेड एक्सप्रेसमध्ये महिलेचे पाच तोळ्यांचे दागिने चोरी; दौंड लोहमार्ग पोलिसांत गुन्हा दाखल

Shirur Civic Action: शिरूर नगर परिषदेची अतिक्रमणांवर मोठी कारवाई; ९०हून अधिक टपऱ्या, शेड, भिंती जमीनदोस्त, तणावानंतर पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT