liquorban 
विदर्भ

वर्धा - आर्वी तालुक्यात दारूविक्रीला बसणार चाप

राजेश सोळंकी

आर्वी (वर्धा) : आर्वी तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात संपूर्णपणे दारूबंदी आहे. वर्धा जिल्हा हा गांधी जिल्हा म्हणून ओळखला जातो, पण जिल्ह्यात सर्रासपणे प्रशासनासमोर दारूविक्री सुरू असल्याचे चित्र असुन याचा फटका गरीब परिवारातील महिलांना बसतो आहे. 

आर्वी तालुक्यात आणि शहरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या अवैध दारू व्यवसायकडे पोलीस प्रशासन केव्हा लक्ष देणार? असा प्रश्न नागरिकांना पडला होता. यासंदर्भात बातमी प्रसिद्ध झाल्यावर या प्रकाराची तहसीलदार विजय पवार यांनी दखल घेत जाहीर नोटीसच जारी केली. 

या  अनुषंगाने तालुक्यातील अवैध व्यवसायबाबत तहसीलदार विजय पवार व नायब तहसीलदार आनंद देवकर यांनी चर्चा केली. तहसीलदार हे तालुका दंडाधिकारी असुन तालुका दारूबंदी समितीचे अध्यक्ष आहेत.

प्राप्त अवैध दारुविक्रीच्या अनुषंगाने तालुका दंडाधिकारी यांच्या नियंत्रणखाली येणाऱ्या आर्वी तळेगाव पुलगांव खरांगना या पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या भागामध्ये जुगार अमली पदार्थ विक्री अवैध दारू विक्री होत असल्यास नागरिकांनी तहसिल कार्यालयात लिपीक प्रकाश हाडोळे यांचेकडे तक्रार द्यावी. तक्रारकर्त्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे या जाहीर नोटीस मध्ये नमूद आहे.

तहसिल कार्यालयाचा फोन नंबर ०७ १५७ २२२०२२  असा असुन या भ्रमणध्वनी क्रमांकावर माहिती देता येईल. यामुळे अनेक नागरिक आणि महिलांना दिलासा मिळाला असून अवैध व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहे. 

यासंदर्भात तहसीलदार यांना विचारणा केली असता, दारूबंदी समितीच्या सभेत मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या. महिलांना त्याचा त्रास होतो. तालुक्यातुन आणि शहरातुन ही फोनवर नागरिकांच्या तक्रारी होत्याच. त्या अनुषंगाने अवैध दारु व्यवसायाबाबत विचार करुन ही कार्यवाही करणार आहे. आणि त्याचप्रमाणे आर्वी विभागातिल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सर्व गावाना या सुचना देउन अवैध व्यावसायिकावर कार्यवाही केल्या जाणार आहे.
- विजय पवार, तहसीलदार आर्वी तथा अध्यक्ष दारूबंदी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: ट्रम्पच्या निर्णयानंतर सोनं-चांदीच्या भावात मोठा बदल! मुंबई-पुण्यात सोनं किती रुपयांना?

Konkan Railway : CM फडणवीसांचं पत्र अन् राणेंचा दिल्लीत पाठपुरावा! सावंतवाडी टर्मिनसवर 'राजधानी'सह 3 महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मंजूर, रेल्वेमंत्र्यांनी काय केली घोषणा?

Marathi News Live Updates: मंत्रालयासमोर झाडावर चढून शेतकऱ्यांचे आंदोलन, सरसकट कर्जमाफीसह हमीभावाची मागणी

Chhatrapati Sambhajinagar: ज्ञानमंदिराच्या वाटेवर कडेवरच्या कसरती!; वरद विद्या मंदिरकडे जाणारा रस्ता खड्डे, चिखलाने माखल्याने पालक त्रस्त

IND vs ENG: भारताला ऐतिहासिक लॉर्ड्स कसोटीपूर्वी धक्का! प्रमुख फलंदाज संघातून बाहेर, बदली खेळाडूची BCCI कडून घोषणा

SCROLL FOR NEXT