Bhandara News : निवडणुकीचा कौल कुणाच्या पत्थ्यावर? महायुती-महाविकास आघाडीत होणार जोरदार सामना Sakal
विदर्भ

Bhandara News : निवडणुकीचा कौल कुणाच्या पत्थ्यावर? महायुती-महाविकास आघाडीत होणार जोरदार सामना

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे.

दीपक फुलबांधे - सकाळ वृत्तसेवा

भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्यात कोणतीही हवा नसताना मतदानाची टक्केवारी घटलेली आहे. त्यामुळे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात जनतेचे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या कामगिरीकडे लक्ष लागले आहे. महायुती आणि आघाडीच्या बाजूने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे लढत असल्याने सामना मोठा रंजक झालेला आहे.

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यामध्ये मुख्य लढत होत आहे. यावेळी निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये माजी आमदार सेवक वाघाये आणि भाजपचे बंडखोर आणि बहुजन समाज पक्षाचे उमेदवार संजय कुंभलकर यांनीही जोरदार प्रचारा केला.

२०१९ च्या निवडणुकीप्रमाणे यावेळी पंतप्रधान मोदी यांची लहर निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, महाराष्ट्रातील बदलेली सत्ता समीकरणांमुळे मतदारांमध्ये अनेक प्रश्‍न निर्माण झाले होते. विशेष म्हणजे भाजपने शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्य फोडाफाडी करून स्थापन केलेली राज्यातील सत्ता, याविषयावरून मतदारांत उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्याबाबत सहानुभूती झाली आहे.

यामध्ये सत्तेच्या बाजूला गेलेले लोकप्रतिनिधी आणि पक्षासोबत जुळून राहिलेले प्रामाणिक कार्यकर्ते यांच्यात निवडणुकीत जुगलबंदी दिसून आली. जेथे मोठमोठे विकास कामे केल्याचे दावे आमदार, खासदार करत होते. तेव्हा तेच ईडी व सीबीआयच्या धाकावरून सत्तेत सहभागी झाल्याचे आरोप विरोधक करत होते. यामुळे प्रचाराच्या रणधुमाळी मतदारांचे चांगली मनोरंजन झाले.

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का काही प्रमाणात कमी झाला. दोन्ही जिल्ह्यातील सहा पैकी पाच आमदार सत्तेत सहभागी झाले आहेत. काँग्रेसने युवा उमेदवार दिल्यामुळे त्यांचा निभाव लागणार नाही, असे समीकरण आधी सांगितले जात होते. परंतु, मतदान झाल्यावर मात्र, महायुती असो की आघाडी, विजयासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. परिणामी विजयाचे अंतर २०१९ प्रमाणे नक्कीच नसले, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

निकालावर परिणाम करणारे घटक

  • तेली व पोवार समाजाला उमेदवारी नाही

  • वंचित बहुजन आघाडीने दिलेला ढिवर समाजाचा उमेदवार

  • संजय कुंभलकर यांचा ग्रामीण भागातील झंझावाती प्रचार

  • वाढती बेरोजगारी व धान शेतीबाबत सरकारचे दुर्लक्ष.

  • धान खरेदी केंद्रात झालेला गैरप्रकार आणि रेंगाळत राहिलेला बोनसचा मुद्दा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT