man died just after two days of marriage in laws house in wardha  
विदर्भ

...अन् नववधू पतीचा मृतदेह घेऊनच पोहोचली सासरी, हिरव्या मंडपातूनच निघाली अंत्ययात्रा

मंगेश काळे

हिंगणी (जि. वर्धा) : विवाहापासून तर कथेपर्यंतचे सर्व चालीरिती पार पडल्या. मात्र, आपल्या आयुष्यभराच्या जोडीदारासोबत वैवाहिक जीवनाला सुरुवात करण्याआधीच त्याच्यावर काळाने झडप घातली. सासुरवाडीतून सत्यनारायणाची कथा आटोपून घरी नववधूसह सुखरूप पोहोचण्याऐवजी सुभाषचा मृतदेहच घरी पोहोचला. जे घर मुलाच्या लग्नाने आनंदाने भारावून गेले होते, त्या कुटुंबासह अख्खं गाव सुन्न झालं. 

सुभाष दशरथ मराठे (वय 28) रा. हिंगणी असे मृताचे नाव आहे. स्थानिक पुरातन शिवमंदिर परिसरात राहणाऱ्या सुभाष मराठे याचा विवाह 19 मार्च रोजी चामोर्शी जि. गडचिरोली येथे वधू मंडपी धूमधडाक्‍यात अनेक लोकांच्या उपस्थितीत पार पडला. सुभाष हा घरचा मोठा मुलगा असून तोच कमावता होता. तो नागपूर जिल्ह्यातील हिंगणा येथील लोहा कंपनीत साहित्य गुणवत्ता तपासणी पदावर कार्यरत होता. तो कथेसाठी नववधूसोबत चामोर्शी येथे गेला होता. 24 मार्च रोजी सकाळी कथा आटोपल्यावर जेवणावळी सुरू होत्या. लग्नाच्या लगबगीचा भार एकट्यावर असल्याने चांगलीच दगदग झाली होती. कथा झाल्यावर उसंत मिळाल्याने तो विश्रांती घेत असता त्याला अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्याने विश्रांती घेतली. यानंतर थोडे बरे वाटू लागेल, असे त्याला वाटले. मात्र, काही वेळातच त्याने नेहमीसाठीच न परतण्यासाठी जीवनातून विश्रांती घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. 

बुधवारी (ता. 24) सायंकाळी त्याचे पार्थिव घेऊनच नववधू सेलूला पोहोचली. गुरुवारी त्याच्यावर स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सुभाष हा स्थानिक इसार पेट्रोल पंपचे व्यवस्थापक पंकज पुरुषोत्तम वाल्दे याचा मामे भाऊ असून त्याच्या पश्‍चात वृद्ध आईवडील, नवविवाहित पत्नी व लहान भाऊ, असा आप्त परिवार आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Panchganga River Water level Update : पंचगंगेची पातळी सहा फुटांनी उतरली, इचलकरंजीतही पातळीत घट; कोल्हापुरात अद्याप 24 बंधारे पाण्याखाली, 41 मार्ग बंदच

Latest Marathi News Live Update : कागल तहसीलदारांना धमकी; पिंपळगाव खुर्दच्या एकाविरोधात गुन्हा

India A vs Nepal: BCCI चा मोठा निर्णय! भारत 'अ' संघ पहिल्यांदाच नेपाळ दौऱ्यावर; डिसेंबरमध्ये रंगणार ऐतिहासिक T20 मालिका

Nagpur: क्रिप्टोकरन्सीच्या नावावर फसवणूक; आरोपीला पश्‍चिम बंगालमधून अटक; १३ जुलैपर्यंत पोलिस कोठडी

Chat Gpt बंद होणार? Apple चा OpenAI विरोधात खटला दाखल; ट्रेड सीक्रेट चोरीचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT