dhotre.jpg 
विदर्भ

केंद्रीय राज्यमंत्र्यांना बसला राज्य शासनाच्या निर्णयाचा फटका!

सकाळ वृत्तसेवा

अकोला : जिल्हा नियोजन समितीवर (डीपीसी) नियुक्त करण्यात आलेल्या जिल्ह्यातील 12 ‘विशेष निमंत्रित’ तसेच ‘नामनिर्देशित’ सदस्यांच्या नियुक्त्या शासनाने रद्द केल्या आहे. तसे आदेश शासनाच्या नियोजन विभागाने 20 डिसेंबर रोजी काढले असून या विषयी प्रत्येक जिल्ह्याला कळविण्यात आले आहे.

राज्य सरकारच्या या आदेशाने मानव संसाधन विकास, दूरसंचार व इलेक्ट्रानिक व सूचना प्राद्योगिकी विभागाचे कॆंद्रीय राज्यमंत्री व जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे यांचे डीपीसीवरील सदस्यत्व रद्द झाले आहे. विशेष म्हणजे राज्यात सरकार बदलताच संबंधित नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्र जिल्हा नियोजन समिती (रचना व कामे) अधिनियम 1998 मधील तरतदीनुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा नियोजन समिती गटीत करण्याची तरतूद आहे. त्यानुसार सर्व जिल्ह्यांसाठी जिल्हा नियोजन समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे. नियोजन समितीमध्ये निवडून आलेल्या सदस्यांसह निमंत्रित आणि नामनिर्देशित सदस्यांचा समावेश आहे.

राज्य शासनाने जिल्हा नियोजन समिती व जिल्हा नियोजन कार्यकारी समितीवरील नामनिर्देशित सदस्य व विशेष निमंत्रित सदस्य यांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत. या संदर्भातील आदेश उपसचिव वि.फ. वसावे यांनी जारी केला आहे. यामुळे जिल्हा नियोजन समिती व जिल्हा नियोजन कार्यकारी समितीवरील 1 नामनिर्देशित सदस्य व 11 विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.

शासन आदेशाचा यांना बसला फटका
नागपूर येथील विदर्भ विकास मंडळाचे सदस्य रविंद्र कोल्हे यांची डीपीसीवर ‘नामनिर्देशित सदस्य’ पदी नियुक्ती करण्यात रद्द करण्यात आली आहे. त्यासोबतच ‘विशेष निमंत्रित सदस्य’ पदी नियुक्त केंद्रीय राज्यमंत्री व जिल्ह्याचे खासदार संजय धोत्रे, विधानसभा सदस्य हरीष पिंपळे यांच्यासह अशोक ओळंबे, नारायणराव गव्हाणकर, वसंतराव खोटरे, हरीष अलीमचंदाणी, गणेश तायडे, सेवकराम ताथोड, गोपाल खंडेलवाल, श्रीरंग पिंजरकर, राजेश मिश्रा यांच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गणेशोत्सवासाठी धावणार चिपळूण-पनवेल मेमू, मडगाव-लोकमान्य टिळक टर्मिनस गाडीचीही घोषणा; पाहा वेळापत्रक

Sindhudurg Teacher Recruitment: सिंधुदुर्गात शिक्षक भरतीचा फज्जा? २८२ पदांची जाहिरात, मिळणार फक्त १६९ शिक्षक; पुन्हा २२५ पदे रिक्त

Mumbai Crime: मुंबईत हायप्रोफाइल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, २६ वर्षीय मॉडेलचा सौदा; प्रसिद्ध हॉटेलच्या रूमवर कंडोमचा बॉक्स अन्...

Marathi News Live Updates : सोलापुरात मराठा आंदोलकांचा रास्ता रोको, पुणे-हैदराबाद महामार्गावर वाहतूक ठप्प

७०,००,००,०००! सचिन तेंडुलकरने 'मुंबई-पुणे'जवळ खरेदी केला भूखंड, ३.९ एकरावर उभारणार सेकंड होम; नेमकी ही जागा कुठे?

SCROLL FOR NEXT