pandhari katekhaye sakal
विदर्भ

मैंने शेर को मारा, म्हणत घेतला माकडाचा जीव

सध्या वन्यप्राण्यांचा मोर्चा हा गावांकडे जास्त वळला असून यातून अनेक घटना समोर येत आहेत.

अभय भुते

सध्या वन्यप्राण्यांचा मोर्चा हा गावांकडे जास्त वळला असून यातून अनेक घटना समोर येत आहेत.

जेवनाळा (जि. भंडारा) - सध्या वन्यप्राण्यांचा मोर्चा हा गावांकडे जास्त वळला असून यातून अनेक घटना समोर येत आहेत. मात्र पालांदूर येथे एका वयोवृध्द नागरिकाने चक्क माकडाला मारून स्वतःच्या घराला लटकविल्याची एक विचित्र घटना समोर आली आहे.

लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे मंगलावरला दुपारी पंढरी बाजीराव काटेखाये (वय 75 वर्ष) यानी माकडाला मारून स्वतः च्या घराच्या रेलिंग वर अडकवून ठेवत. मैंने शेर को मारा, म्हणत असल्याचे काही नागरिकांना दिसले त्यावेळी तो माकड जिवंत असेल व त्याला वाचविण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बोलाविण्यात आले मात्र कर्मचारी मोक्यवर पोहचले असता तो माकड मृत पावल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी अड्याळ घनश्याम ठोंबरे यांच्या मार्गर्शनात एम. व्ही. श्यामकुवर क्षेत्र सहाय्यक किटाडी,एन. पी. पारधी, एस. एल. कूंभरे, एस. ए. गायकवाड, कु. टी.जी. गायधने, की. ए . यू. बडोले यांनी मौक्यावर पोहचून संशयीत आरोपी पंढरी बाजीराव काटेखाये याला तपासासाठी ताब्यात घेतले असून भारतीय वन्यजीव, (संरक्षण) 1972 अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला आहे पुढील तपास सुरू आहे.

या घटनेत मृत पावलेल्या माकडाला वन विभागाने आपल्या ताब्यात घेतले असून त्याच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.मात्र ही घटना कोणत्या कारणाने घडली हे अद्याप समोर आले नाही.

वन्य प्राण्यांची अश्या प्रकारे हत्या होणे हे समाजाला कलंकित करणारी घटना असल्याचे प्राणी मित्रांचे म्हणने आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT